Sanjay Narvekar became lucky brother | संजय नार्वेकर बनला लकी भाई
संजय नार्वेकर बनला लकी भाई

ठळक मुद्देसंजय नार्वेकर दिसणार माय नेम इज लखन मालिकेतसंजय नार्वेकरने साकारली लकी भाईची भूमिका


सोनी सब वाहिनीवर 'माय नेम इज लखन' ही मालिका लवकरच दाखल होत आहे. तर या मालिकेत अभिनेता संजय नार्वेकर लकी भाईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका तरुणाने सुधारणेच्या मार्गावर जाण्याच्या केलेल्या प्रयत्नांची कथा पाहायला मिळणार आहे. 


याबाबत संजय नार्वेकर अर्थात लकी भाई म्हणाला, “ही मालिका विनोद, रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ असणार आहे. काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करताना याला थोडा फिल्मी टचही देण्यात आला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमची मालिका अवश्य बघावी अशी विनंती मी करत आहे. तुम्हांला मालिका आवडली तर आमचे कौतुक करा आणि जर आम्ही
काही चुका केल्या असे तुम्हांला वाटत असेल तर अवश्य आमचे कान पकडा. पण त्यासाठी कृपया माय नेम इज लखनही मालिका बघा.”


'माय नेम इज लखन' ही मालिका म्हणजे नव्याने आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखनचा प्रवास आहे. आपल्या या नव्या मार्गावरुन प्रवास करताना आपल्या स्वतःच्या अंदाजात चांगल्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नांत अनेकदा विनोदी प्रसंग निर्माण होतात. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. श्रेयस लखनच्या भूमिकेत दिसणार आहे. माय नेम इज लखन मालिकेचे प्रिमीयर २६ जानेवारी रोजी सादर होणार असून मालिका दर शनिवार आणि रविवार, केवळ सोनी सबवर सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. संजय नार्वेकर व श्रेयस तळपदे यांना वेगळ्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 


Web Title: Sanjay Narvekar became lucky brother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.