Sangram samel will take entry in tu ashi javali raha serial | 'या' अभिनेत्याची होणार 'तू अशी जवळी रहा'मध्ये एंट्री!

'या' अभिनेत्याची होणार 'तू अशी जवळी रहा'मध्ये एंट्री!

झी युवा' वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेत झालेला नव्या पात्राचा प्रवेश, मालिकेला एक नवे वळण देणारा ठरणार आहे. मालिकेच्या मागील काही भागांमध्ये 'कैवल्य जहागीरदार' हे पात्र पाहायला मिळत आहे. अभिनेता संग्राम समेळ, ही भूमिका उत्तमरित्या बजावत आहे. कैवल्य हे एक समजूतदार आणि खिलाडूवृत्तीचे व्यक्तिमत्व आहे. कुणाशीही पटकन मैत्री करण्याची त्याच्याकडे कला आहे. आपल्या या गुणांच्या जोरावर कुणालाही आपलंसं करून घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याचा मालिकेतील सहजसुंदर वावर, इतर पात्रांवर त्याची पडत असलेली छाप, या भूमिकेचे महत्त्व वाढवते. थोड्याच दिवसांकरिता मालिकेत दिसणार असलेला कैवल्य, या मालिकेला नवे वळण मात्र देऊन जाणार आहे. त्याची मालिकेतील उपस्थिती फार काळासाठी नसल्याने, प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कैवल्यने आयुष्यात केलेला शिरकाव, राजवीर आणि मनवाच्या आयुष्यात नक्की काय वळण घेऊन येईल, हे पाहणं उत्सुकतेचे ठरले. 'तू अशी जवळी राहा' या मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी राजवीर आणि मनवाला भरपूर प्रेम दिले आहे.

संग्राम 'ललित २०५'या मालिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो  'एकच प्याला' या नाटकात दिसला होता. या संगीत नाटकातील सुधाकरची भूमिका संग्रामने साकारली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sangram samel will take entry in tu ashi javali raha serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.