शिव अवतारात अवतरली 'संभाजी' मालिकेतील ही अभिनेत्री, ओळखा पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:32 PM2019-08-06T13:32:52+5:302019-08-06T13:33:36+5:30

संभाजी मालिकेतील या अभिनेत्रीनं नुकतंच फोटोशूट केलं असून त्यातील शिव अवतारातील फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Sambhaji Fame Ashwini Mahangade's Shiv look | शिव अवतारात अवतरली 'संभाजी' मालिकेतील ही अभिनेत्री, ओळखा पाहू

शिव अवतारात अवतरली 'संभाजी' मालिकेतील ही अभिनेत्री, ओळखा पाहू

googlenewsNext


अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

अश्विनीनं नुकतंच फोटोशूट केलं. त्यातील काही फोटोंमध्ये ती खूप ग्लॅॅमरस दिसते आहे. मात्र तिच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने हा फोटो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती शिव अवतारात दिसते आहे. या अवतारात तिला ओळखताही येत नाही.

तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, मैं शिव बनकर तुझे अपनाऊंगा, तांडव नृत्य भी कर जाऊंगा, भस्म लगाकर आऊंगा, तुझको अपनी रूह मे समाऊंगा, अर्ध नारीश्वर कहलाऊंगा..! || हर हर महादेव ||

अश्विनीचं हे फोटोशूट श्रावणी सोमवारच्या निमित्ताने केलं असून सज्जना दुतल यांना मेकअप केला आहे. तर दादा कपाने यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हा फोटो कैद केला आहे.

अभिनयाशिवाय सामाजिक भान जपत अश्विनीने 'स्वराज्य परिपूर्ण किचन' हे हॉटेल नुकतेच मिरा रोड येथे सुरु केले आहे.

या हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना थाळी मिळते. या स्वराज्य थाळीमध्ये दोन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, वरण-भात, पापड, कोशिंबीर, एक गोड पदार्थ आणि ताक अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे.

अश्विनीच्या या उपक्रमासाठी तिचे कौतूक करू तेवढे कमीच आहे.

Web Title: Sambhaji Fame Ashwini Mahangade's Shiv look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.