Salman khan scared to shoot bigg boss 14 in corona says have a newborn niece at home | कोरोना काळात शूटिंग करण्यासाठी घाबरतोय सलमान खान, म्हणाला- माझ्या घरी...

कोरोना काळात शूटिंग करण्यासाठी घाबरतोय सलमान खान, म्हणाला- माझ्या घरी...

'बिग बॉस 14' प्रेस कॉन्फ्रेंस गुरुवारी पार पडली. यावेळी सलमान खानने या शोशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. लॉकडाऊनमध्ये त्या शूटिंग करण्याचा अनुभव यावेळी सलमानने सांगितला. 

आजतकच्या रिपोर्टनुसार सलामान खान म्हणाला की, मी शूटिंग करण्यासाठी घाबरतो आहे. प्रत्येकजण सुरक्षेची काळजी घेतो आहे.  पीपीई किट, मास्क, हातमोजे घातल आहेत. मात्र माईक एडजस्ट करण्यासाठी क्रू जवळ येतो. मी सर्दी, खोकल्याला घाबरतो आहे. मी आधी शूट करण्यासाठी घाबरत होतो कारण माझ्या घरी लहान मुल आहे. माझी बहीण अर्पिता खानची मुलगी आयत, भाचा अहिल, आई-बाबा यांच्यासाठी मी घाबरत होतो. मला स्वत:साठी भीती वाटतं नाही जेवढी आपल्या लोकांसाठी वाटते. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले आहे. 


बिग बॉसच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सलमानने सांगितले की, टीममधील इतरांना संपूर्ण मानधन पूर्ण मिळण्यासाठी तो स्वत:च्या मानधनात कपात करण्यास तयार आहे. शोच्या निर्मात्यांशी बोलताना सलमान म्हणाला,माझे मानधन कमी केले तर मला आनंद होईल जेणेकरून टीम मधील इतर लोकांना त्यांचा पगार मिळू शकेल. 'बिग बॉस 14' 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. गायक कुमार सानू यांचा मुलगा या शोचा पहिवा कंटेस्टेंट असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावरुन 3 ऑक्टोबरला पडदा उठणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khan scared to shoot bigg boss 14 in corona says have a newborn niece at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.