सलमान खानप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये होते या अभिनेत्याची गणना, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:39 PM2020-04-25T17:39:03+5:302020-04-25T17:39:37+5:30

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत बलदंड शरीरयष्टी असलेला राणा पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर हिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत विवाहबद्ध होतो.

Like Salman Khan Hardeek Joshi Also Most Eligible Bachelor Of Marathi Film Inudustry-SRJ | सलमान खानप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये होते या अभिनेत्याची गणना, कोण आहे तो?

सलमान खानप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये होते या अभिनेत्याची गणना, कोण आहे तो?

googlenewsNext


बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान.तसेच मराठीत मोस्ट एलिजेबल बॅचलर कोण ? तर उत्तर आहे. तुझ्यात जीवं रंगला फेम राणा दा, होय राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हा विवाहीत नाही हे वाचून अनेक तरूणींचा जीव भांड्यात पडला असेल. हार्दिकची तरूणींमध्येच नाहीतर सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये त्याची लोकप्रियता अमाप आहे. 2015 मध्ये आलेल्या 'रंगा पतंगा' या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे. हार्दिकची शरीरयष्टी राणा पहिलवानाच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य आहे. हार्दिकला व्यायामाची आवड आहेच सोबतच त्याला ढोल वाजवायला देखील आवडते. 


'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत बलदंड शरीरयष्टी असलेला राणा पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर हिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत विवाहबद्ध होतो. मालिकेत संसारात रमलेला राणा खासगी आयुष्यात मात्र सिंगल आहे. म्हणूनच मराठी इंडस्ट्रीतील मोस्ट एलिजिबल बॅचलरमध्ये  राणादा म्हणजेच हार्दिकच्या नावाची वर्णी लागते.

हार्दिक जोशीने या आधीदेखील अस्मिता, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

Web Title: Like Salman Khan Hardeek Joshi Also Most Eligible Bachelor Of Marathi Film Inudustry-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.