Sakshi Tanwar and Shweta Kawatra do you too, Mohoshabad web site for 12 years | साक्षी तन्वर आणि श्वेता कवात्राची करले तू भी मोहोब्बत या वेबसिरीजद्वारे 12 वर्षांनी जमली जोडी

साक्षी तन्वर आणि श्वेता कवात्राची करले तू भी मोहोब्बत या वेबसिरीजद्वारे 12 वर्षांनी जमली जोडी

कहानी घर घर की ही मालिका 2000च्या सुरुवातीला प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. पण त्यातही पार्वती आणि पल्लवी या तर प्रेक्षकांच्या सगळ्यात आवडत्या व्यक्तिरेखा होत्या. या मालिकेत साक्षी तन्वरने पार्वतीची तर श्वेता कवात्राने पल्लवीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील पल्लवी आणि पार्वतीमध्ये असलेले वॉर प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे. या दोघी सशक्त अभिनेत्री असल्याने त्या दोघांचे सीन चांगलेच गाजायचे. आता पुन्हा एकदा 12 वर्षांनंतर ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत आणि विशेष म्हणजे बालाजी टेलिफ्लिम्सच्या कहानी घर घर की या मालिकेत एकत्र काम केल्यानंतर बालाजीच्याच करले तू भी मोहोब्बत या वेबसिरिजमध्ये ते दोघे एकत्र झळकणार आहेत.
करले तू भी मोहोब्बत ही वेबसिरिज सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरिजमध्ये साक्षी तन्वर आणि राम कपूर आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दोन विरुद्ध स्वभावाचे नायक-नायिका एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे आपल्याला या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळत आहे. या वेबसिरिजमधील राम आणि साक्षीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याच वेबसिरिजमध्ये लवकरच श्वेता कवात्राची एंट्री होणार आहे. श्वेताने अभिनेता मानव गोहिलसोबत लग्न केले आहे. श्वेता संसार, मूल यांच्यात रमल्यामुळे छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. पण आता ती या वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. तिने स्वतः सोशल मीडियाला साक्षीसोबत एक फोटो शेअर करून तिच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. 

Web Title: Sakshi Tanwar and Shweta Kawatra do you too, Mohoshabad web site for 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.