ठळक मुद्देबडे अच्छे लगते है या मालिकेत राम आणि साक्षी यांचे सुरुवातीला पटत नाही. पण कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले होते. त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक दाखवण्यासाठी साक्षी आणि राम कपूरवर लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते

छोट्या पडद्यावर विविध मालिकांमधून नवनवीन जोड्या समोर येतात. मात्र त्यापैकी काही जोड्या रसिकांच्या कायम लक्षात राहतात. त्यापैकीच साक्षी तन्वर आणि राम कपूर या ऑनस्क्रीन कपलने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून या जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या दोघांची अदाकारी आणि केमिस्ट्री यामुळे ही जोडी छोट्या पडद्यावरची सुपरहिट जोडी ठरली. या जोडीने छोट्या पडद्यावरचा सगळ्यात बोल्ड सीन दिला होता हे तुम्हाला माहीत आहे का?

‘बडे अच्छे लगते है’ ही एकता कपूरची मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. पण त्याचसोबत एका वेगळ्या कारणामुळे ही मालिका चर्चेत आली होती. या मालिकेत राम आणि साक्षीवर काही इंटिमेंट सीन चित्रीत करण्यात आले होते. कोणत्याही मालिकेत इतके बोल्ड सीन दाखवले जाण्याची बहुधा ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे ही दृश्यं पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

बडे अच्छे लगते है या मालिकेत राम आणि साक्षी यांचे सुरुवातीला पटत नाही. पण कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले होते. त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक दाखवण्यासाठी साक्षी आणि राम कपूरवर अनेक लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते. या सीन्सची दीर्घकाळ चर्चा रंगली होती. राम आणि साक्षीवर चित्रीत करण्यात आलेला हा इंटिमेट सीन हा तब्बल १७ मिनिटांचा होता. हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला होता. मालिका या सगळ्या वयोगटातील लोक घरात एकत्र बसून पाहातात, त्यामुळे अशाप्रकारचे सीन मालिकेत दाखवणे चुकीचे असल्याची अनेकांनी टीका देखील केली होती. या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने या मालिकेच्या काही वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत हा सीन दाखवून मी चूक केली अशी कबुली दिली होती.

राम आणि साक्षीची जोडी बडे अच्छे लगते है या मालिकेनंतर प्रचंड हिट झाली. त्यानंतर करले तू भी मोहोब्बत या वेबसिरिजमध्ये देखील ते दोघे एकत्र झळकले होते. या वेबसिरिजमधील त्यांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sakshi Tanwar and Ram Kapoor's intimate scene in Bade Acche Lagte Hain PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.