रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींची यादीही मोठीच आहे. यातच रसिकांचे फेव्हरेट कपल रुबिना  दिलाइक आणि अभिनव शुक्लापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक खुलासा करताच अनेकांनी आश्चर्यच वाटले आहे.


रुबिना आणि अभिनव यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. तेव्हापासून दोघांचेही रोमँटीक फोटो पाहून चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंटस द्यायचे.  'बिग बॉस सीझन 14' मध्ये पहिल्यांदच रुबीना दिलाइक आणि अभिनव शुक्लाची एन्ट्री झाली आहे. शोच्या सुरूवातीपासूनच दोघेही  एकाच टीममध्ये होते. या दोघांचे लग्नानंतक काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले होते.

दोघांचेही वैवाहिक आयुष्याच सुरळीत नव्हते. दोघेही एकमेकांसोबत एन्जॉय करत नव्हते. त्यामुळे अभिनवला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याचे रूबीनाने सांगितले.  रुबिना आणि अभिनव या जोडीला बिग बॉसमध्ये का आणले गेले आहे यावरून सर्वात मोठे रहस्य समोर आले आहे.

 
या दोघांनीही नोव्हेंबरपर्यंत एकमेकांना वेळ दिला असल्याचे रुबीना म्हणाली. त्यानंतर त्याचे घटस्फोट होणार होते. असं म्हणत रुबीना सांगताच भावूक झाली.  जर हा शो नसता तर आम्ही वेगळे झालो असतो असेही तिने सांगितले. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता आला. रुबिनाला रडताना पाहून अभिनवचे डोळेदेखील पाणावले.

दिग्दर्शकाचे बोलणे ऐकून हादरून गेली होती रुबीना दिलाइक, बॉलिवूडमध्ये काम न करण्याची घेतली होती शपथ

रुबीना दिलाइकने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी एका मुलाखतीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले होते. रुबीना दिलाइकने सांगितले होते की बॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना कसे कमी लेखले जाते. तसेच सहा वर्षांपूर्वी रूबीनाला बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. पण तिला आलेल्या वाईट अनुभवामुळे बॉलिवूडमध्ये काम न करण्याची शपथ घेतली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rubina Dilaik's Big Confession, Before Divorce, She Gave Time To Abhinav Shukla Till November, They Would Have Separated If Not Were In Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.