ठळक मुद्देनेहा आणि आदित्य 14 फेब्रुारीला लग्न करणार आहेत असा अंदाज वर्तवला जात असताना डिसेंबर 2020 मध्ये रोहित देखील लग्न करू शकतो असे आता म्हटले जातेय.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी कंगना रणौत हजेरी लावणार आहे. कंगना तिच्या पंगा या आगामी चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात करणार आहे. इंडियन आयडल ११ मधील मराठी मुलगा रोहित राऊत या कार्यक्रमाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातो. त्याच्या ऑडिशनपासून आजपर्यंतच्या परफॉर्मन्सचे प्रत्येकाकडून कौतुक होत आहे. त्याच्या परफॉर्मन्समध्ये एक एनर्जी नेहमीच पाहायला मिळते.


 
आगामी भागात रोहित राऊत “के पग घुंघरू” या गाण्यावर सुरेल परफॉर्मन्स सादर केला. त्याच्या या परफॉर्मन्सवर कंगना प्रचंड खूश झाली आणि ती नेहमीच रोहितचा परफॉर्मन्स फॉलो करते. त्याचा आवाज तिला प्रचंड आवडतो असे तिने आवर्जून सांगितले. तसेच तिने रोहितसोबतच त्याच्या वडिलांचे देखील कौतुक केले. त्याच्या वडिलांनी त्याचे पालनपोषण खूपच चांगल्या पद्धतीने केले असल्याचे तिने सगळ्यांसमोर कबूल केले.
 
जस्सी गिलने रोहितचे कौतुक करताना म्हटले की, “तुझी एनर्जी पाहून मला नेहा कक्करची आठवण येते.”


 
नेहा आणि आदित्य 14 फेब्रुारीला लग्न करणार आहेत असा अंदाज वर्तवला जात असताना डिसेंबर 2020 मध्ये रोहित देखील लग्न करू शकतो असे आता म्हटले जातेय. यात किती तथ्य आहे हे केवळ रोहितच आपल्याला सांगू शकतो.
 
इंडियन आयडल 11 चा हा खास भाग शनिवारी आणि रविवारी रात्री 8.00 वाजता प्रेक्षकांना सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Rohit Raut will marry in 2020?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.