Rohit Raut sing song for tu ashi javali raha | रोहित राऊतने 'तू अशी जवळी राहा' मालिकेसाठी गायलेले लग्नाला जाऊ दे न व... गाणे तुम्ही ऐकले का?

रोहित राऊतने 'तू अशी जवळी राहा' मालिकेसाठी गायलेले लग्नाला जाऊ दे न व... गाणे तुम्ही ऐकले का?

ठळक मुद्देनाळ चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हे गाणे जयस कुमारने गायले असून रसिक त्याच्या गायनाच्या प्रेमात पडले आहेत. याच लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. 

झी युवा वाहिनीने 'तू अशी जवळी राहा' ही एक वेगळ्या धाटणीची मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची आणि म्हणूनच या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेला आता चांगलीच कलाटणी मिळणार आहे.

‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत  राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवारी ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहाता येणार आहे. हा लग्न सोहळा अगदी दिमाखदार असणार आहे. दोन्ही परिवार एकत्र येऊन राजवीर आणि मनवा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचादिवस खास बनवणार आहेत. लग्न सोहळा हा अगदी रीतसर असून हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. मनवा तिच्या लग्नात मराठमोळ्या पेशवाई लुकमध्ये दिसणार आहे. नववारी साडी, नथ, पेशवाई दागिने आणि मुंडावळ्या यामध्ये मनवाचे सौंदर्य अगदी खुलून दिसणार आहे.

राजवीर आणि मनवा यांच्या लग्नामध्ये खूप सारी धमाल असणार आहे. हळद, संगीत यांसारखे लग्नाच्या आधीचे कार्यक्रम देखील धुमधडाक्यात पार पडणार आहेत. राजवीर आणि मनवा यांच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. 

नाळ चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हे गाणे जयस कुमारने गायले असून रसिक त्याच्या गायनाच्या प्रेमात पडले आहेत. याच लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. 

मनवा आणि राजवीरचा लग्न सोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १ तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे. त्यांच्या लग्नानंतर मालिका अधिक रंजक होणार आहे. 


 

Web Title: Rohit Raut sing song for tu ashi javali raha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.