ठळक मुद्देअमिताभ यांच्या घरातील कोणत्याच सदस्याला कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी नाहीये. ते आपल्या कोणत्याही प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी येऊन या कार्यक्रमाचा भाग बनू शकतात.

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगणार आहे प्रश्न उत्तरांचा रंगमंच. रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात एक पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत झाली. त्यावेळी या कार्यक्रमाशी निगडित अनेक गोष्टींचा अमिताभ यांनी खुलासा केला.

अमिताभ यांच्या कुटुंबियातील सदस्य या कार्यक्रमात एखाद्या स्पर्धकाप्रमाणे कधीही सहभागी होऊ शकत नाही असे अमिताभ यांनी यावेळी सांगतिले. त्यांनी म्हटले की, त्यांच्या घरातील कोणत्याच सदस्याला कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी नाहीये. ते आपल्या कोणत्याही प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी येऊन या कार्यक्रमाचा भाग बनू शकतात. पण एखाद्या स्पर्धकाप्रमाणे या कार्यक्रमाचा भाग व्हायचा अधिकार त्यांना नाहीये. त्यामुळे एक स्पर्धक म्हणून आपल्याला कधीही बच्चन कुटुंबियातील कोणीही पाहायला मिळणार नाहीये.  

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. आता देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

9 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यंदा या सिझनसाठी एक मोठा बदल करण्यात येणार आहे. ते म्हणजे केबीसी या शोची आइकॉनिक ट्यून. अजय-अतुल यांनी केबीसीची नवीन ट्युन बनवली आहे. 

Web Title: This is a reson why Bachchan family can't come to kaun banega crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.