This record was created before Kaun Banega Crorepati started the program | ​ कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच या कार्यक्रमाने रचला हा विक्रम

​ कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच या कार्यक्रमाने रचला हा विक्रम

६ जून रोजी रात्री साडे आठ वाजता जिंदगी के क्रॉसरोड्स कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जेव्हा अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती सत्र दहा ची सुरुवात करत देशाला एक प्रश्न विचारला आणि या कार्यक्रमाच्या नावाने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. एकाच प्रश्नाच्या उत्तरादाखल सर्वाधिक सहभाग मिळाला. देशभरातून इच्छुक स्पर्धकांच्या २७.२ लाख प्रवेशिका आल्या असून ही संख्या खूपच जास्त आहे. 
कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासात नोंदणीसाठी लोकांनी दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व होता. अर्थात त्यापैकी अगदी मोजक्या भाग्यवंतांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तरीही हा कार्यक्रम लोकांचे नशीब बदलणारा आणि आपल्या ज्ञानाची ताकद आजमावणार्‍या लोकांसाठी बनलेला आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजनवर फॅमिली गेम शो या प्रकाराची नव्याने व्याख्या केली. त्यामुळे प्रेक्षक प्रत्येक सत्राची आतुरतेने वाट बघत असतात. या सत्राची नोंदणी २२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे, ज्यात रात्री साडे आठ वाजता अमिताभ बच्चन एक प्रश्न विचारतील. नोंदणीसाठी या प्रश्नांची SMS, IVRS किंवा सोनी LIV मार्फत अचूक उत्तरे द्यायची आहेत. याबाबत बोलताना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनमध्ये डिजिटल प्रॉडक्ट्सचे प्रमुख असलेले अमोघ दुसाद सांगतात, “६ जून रोजी रात्री साडे आठ वाजता आमच्या जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमाचे लॉन्चिंग होण्यापूर्वी KBC च्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा सहभाग लॉग इनच्या रूपात दिसला आणि आम्ही आशा करतो की, २२ जूनपर्यंत याच उत्साहाने देशभरातील लोक सहभागी होतील. प्रत्येक वेळी KBC चे नवे सत्र सुरू करताना आमच्या काही अपेक्षा असतात आणि प्रत्येक वेळी या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता अनुभवास येऊन आम्ही थक्क होतो. यंदाही हेच होत आहे आणि यामुळे ज्ञानाचे सामर्थ्य अधिक दृढ होत आहे, ज्याचा कस भविष्यात लागणार आहे.”
कौन बनेगा करोडपतीसंबंधी अधिक माहितीसाठी बघत रहा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन किंवा www.setindia.com वर लॉग ऑन करा.

Also Read : कौन बनेगा करोडपतीच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांना मिळते इतकी रक्कम... आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This record was created before Kaun Banega Crorepati started the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.