Recognizes Sundara bai every day - Ankita Panvelkar | दररोज नव्याने सुंदराबाईना ओळखते - अंकिता पनवेलकर

दररोज नव्याने सुंदराबाईना ओळखते - अंकिता पनवेलकर

ठळक मुद्देबाळूमामाच्या आईच्या भूमिकेत अंकिता पनवलेकर सुंदराबाईची भूमिका आव्हानात्मक - अंकिता पनवेलकर

कलर्स मराठीवरीलबाळूमामाच्या नावानं चांगभलं” या मालिकेला पहिल्या भागापासून संपूर्ण महाराष्ट्रामधून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेच कथानक, मालिकेतले कलाकार आणि बाळूमामांच्या आयुष्यात घडलेले खिळवून ठेवणारे प्रसंग सगळच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बाळूमामाच्या आईची भूमिका साकारणारी अंकिता पनवलेकर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. 

अंकिता पनवेलकर साकारीत असलेल्या पात्राचे नाव सुंदराबाई असून ही भूमिका आव्हानात्मक वाटत असल्याचे तिने सांगितले. पुढे म्हणाली की, सुंदराबाई  साकारताना अनेक गोष्टी आव्हानात्मक होत्या. पहिली म्हणजे भाषा, दुसरी पेहेराव कारण १८९२ चा काळ पूर्ण उभा करायचा होता, तुमचे वागणे – बोलणे... पण संतोष सरांनी या विषयाचा केलेला अभ्यास, बाळूमामांबद्दलची माहिती किंवा जी भूमिका मी करते आहे त्याबद्दलची त्यांच्याकडे असलेली माहिती या सगळ्या गोष्टींची मला खूप मदत झाली. मला खूप सोपे झाले, साडी – दागिने सांभाळणे, ती भाषा बोलणे, माझे आणि बाळूचे नाते पडद्यावर दाखविणे, सरांच्या त्या भूमिकेबद्दल असलेल्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या होत्या, त्यामुळे नक्कीच खूप आव्हानात्मक गेले. अजूनही अनेक आव्हाने समोर येतात कारण, मी रोज नव्याने सुंदराबाईंना ओळखते आहे. कारण मला त्यांच्याविषयी खूप थोडी माहिती होती. पण आता भूमिकेमुळे मला
त्याच्यांविषयी अनेक गोष्टी जाणून घ्यायला मिळत आहे. आता कुठेतरी मला सुंदराबाई कळायला लागल्या आहेत.
भविष्यात अंकिता पनवेलकरला निगेटिव्ह भूमिका करायला आवडेल, असे सांगितले. ती म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून नेहेमीच काही तरी वेगळे करायला आवडते त्यामुळेच ही भूमिका स्वीकारली. आता मला खलनायिकेची भूमिका साकारायला आवडेल.

Web Title: Recognizes Sundara bai every day - Ankita Panvelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.