छोट्या पडद्यावर हिना खान प्रचंड लोकप्रिय आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मालिकेत तब्बल 8 वर्ष काम केले आहे.  हिनाला साचेबद्ध कामात अडकायचे नव्हते म्हणून तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेला राम राम ठोकला. 

मालिका हिनावर फोकस करत नसल्याचे तिचे म्हणणे होते. म्हणूनच तिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यावेळी अक्षराची लेक नायरा आणि कार्तिक मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा बनले. विशष म्हणजे इतके लोकप्रिय पात्राने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतरही मालिकेच्या टीआरपीवर कोणताही परिणाम झाला नाही. 


संस्कारी बहूने अचानक बिनधास्त बनत 'बिग बॉस 11' मध्ये शोमध्ये एंट्री केली होती. ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही असलेल्या 'बिग बॉस' मध्ये कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. रिपोर्ट्सनुसार,  हिना खान त्या सिझनची सर्वाधिक महागडी कंटेस्टंट होती. तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये दिले गेले होते. बिग बॉसच्या आधी हिना खान 'खतरों के खिलाडी' सिझन 8 मध्ये झळकली होती.

त्यानंतर 'कसौंटी जिंदगी २' मध्ये कोमोलिका बनत सा-यांच्या समोर आली मात्र खूप कमी काळच तिने या मालिकेत दर्शन घडले नंतर तिने ही मालिका सोडली आणि आपला मोर्चा बॉलिवूड सिनेमांकडे वळवला. दिवसेंदिवस मिळणा-या लोकप्रियतेमुळे हिनाने तिचे मानधनही वाढवले. मालिकांच्या एका एपिसोडसाठी ती 2 ते 2. 5 लाख रुपये एवढे मानधन घेते.

त्यामुळेच टीव्ही अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी हिना खान महागडी अभिनेत्री ठरते. लॉकडाऊन काळात सतत काही तरी एक्टीव्हीटी करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहिली. सध्या बॉलिवूड सिनेमांवर फोकस करण्याचा निर्धार तिने केला असला तरीही याहून अधिक मानधन कसे मिळेल याकडेच तिने प्रयत्न सुरू केले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For this Reason Hina Khan Is Highest Paid Actress On Television Now Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.