सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. 


सध्या अनेक सेलिब्रेटी सिनेमात झळकत नसले तरी छोट्या पडद्यावर अधून मधून त्यांचे दर्शन घडत असते. मध्यंतरी रेखा 'गुम  है किसीके प्यार में' मालिकेच्यामाध्यमातून टीव्हीवर झळकल्या होत्या. मालिकेचा प्रोमोही खास रेखा यांच्यावरच चित्रीत करण्यात आला होता. मात्र रेखा केवळ प्रमोशन एक्वीव्हीटी म्हणून या मालिकेचा भाग होत्या. 

फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा रंगली होती. मालिकेच्या एका  प्रोमोसाठी रेखा यांना तब्बल दोन कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.  या शोसोबत रेखा यांचे नाव जोडले गेल्याने मालिकेलाही बरीच प्रसिद्धी मिळेल आणि त्याचा फायदा नक्कीच होईल, मालिकेचा टीआरपी वाढेल असा निर्मात्यांना विश्वास होता.  या प्रोमोत रेखा नेहमीप्रमाणे आपल्या दिलखुश अदांजात 'गुम है किसीके प्यार मे' गाण्याचे बोल गाताना झळकल्या होत्या. रेखा यांच्यावर या शोचा प्रोमो समोर येताच त्यांचे फॅन्स आनंदात होते. 

सध्या रेखा कोणत्याच मालिका किंवा सिनेमात काम करत नाहीत. नुकतेच कपिल शर्मा शोमध्ये रेखा यांना कपिल शर्माने त्यांना हाच प्रश्न विचारला होता. यावर रेखा यांनीही उत्तर देत वेळ निभावून नेली. मात्र यामागचे कारण त्यांनी ऑनस्क्रीन सांगितलेच नाही. टीव्ही शोमध्ये न झळकण्याचे कारण काय कपिलच्या प्रश्नावर रेखा यांनीही विलंब  न लावता ' मी काही दाखवण्याची गोष्ट नाही.' असे उत्तर देत चाहत्यांची मनंच जिंकली होती. 

जेव्हा ऐश्वर्याने अवॉर्ड शोमध्ये सर्वांसमोर रेखा यांना संबोधले होते 'आई', सगळ्यांच्या उंचावल्या होत्या भुवया

खरेतर रेखा यांनी ऐश्वर्याच्या नावाने एका मासिकात भावनिक पत्र लिहित आपले प्रेम व्यक्त केले होते. त्यांनी या पत्राच्या सुरूवातीला मेरी ऐश असे लिहिले होते आणि पत्राच्या शेवटी रेखा माँ असे लिहिले होते.रेखा यांनी पत्रात ऐश्वर्याच्या कित्येक भूमिकांचा उल्लेख करत लिहिले होते की तू प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेस मग रियल लाइफमधील असो किंवा रिल लाइफमधील. त्यांनी लिहिले होते की, तुझ्यासारखी महिला ज्या नदी प्रमाणे असते जी कोणत्याही बनावटी शिवाय पुढे वाहत राहू इच्छिते आहे. ती तिच्या मार्गावर आपल्या ध्येयासोबत पोहचते की तिला तिची ओळख हरवू देणार नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For This Reason Bollywood Diva Rekha Doesn't Work For Tv Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.