बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री इथे ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या. श्रद्धा आर्याचा व्यावसायिक जयंत रत्तीशी साखरपुडा झाला होता. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार होते. मात्र लग्नाला अवघे काही दिवस बाकी असतानाच या दोघांचे ठरलेले लग्न मोडले गेले आहे. लग्न ठरल्यानंतर श्रद्धा जयंतला तो व्यक्ती म्हणून कसा आहे हे ओळखण्याच्या प्रयत्नात होती. जसजसे लग्नाला दिवस बाकी होते, तेव्हा जयंतने आर्यासमोर एक मोठी अट ठेवली आणि ही अट श्रद्धाला अजिबात मान्य नव्हते. 

लग्नानंतर श्रद्धाने काम करु नये अशी जयंतने तिला अट घातली होती. मात्र करिअर घडवणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. तसेच श्रद्धाचेही होते. ज्या नात्यात सुरुवातीपासून काही गोष्टींसाठी अट नियम लागू करण्यात येत असतील असे नाते काय कामाचे त्यामुळे अशा नात्यात न अडकणेच बरे त्यामुळे श्रद्धाने हे लग्न करण्यास नकार दिल्याचे तिने सांगितले. नात्यात दडपणाखाली राहणे अजिबात मान्य नाही. त्यामुळे आता ज्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळतो त्या गोष्टी करत राहण्याचा तिचा मानस आहे. करिअर घडवणे हे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे करिअरवरच जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. 

 

'कुंडली भाग्य' या टीव्ही सीरियलमध्ये प्रीताची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा आर्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वास्तविक जीवनात श्रद्धा आर्या एखाद्या फॅशन मॉडेलपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते, दररोज ती तिच्या चाहत्यांसोबतचे जबरदस्त आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

 

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे ती देखील सक्रीय असते. तिचे विविध अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्याही संख्येत वाढ होत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For This Reason Actress shraddha Arya From Kundali Bhagya Break Up Her Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.