Read Jijaji is on the roof; Hiba Nawab, Rashi Bawa and Nikhil Khurana in the series | वाचा जिजाजी छत पर है या मालिकेतील हिबा नवाब, राशी बावा आणि निखिल खुराना काय सांगतायेत त्यांच्या मैत्रीविषयी
वाचा जिजाजी छत पर है या मालिकेतील हिबा नवाब, राशी बावा आणि निखिल खुराना काय सांगतायेत त्यांच्या मैत्रीविषयी
मैत्री हा एक विशेष बंध आहे आणि तो नेहमी टिकून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला विशेष मित्र असतात पण कामाच्या ठिकाणी जोडलेल्या मैत्रीचे महत्त्व काही वेगळेच असते. बहुतेक लोक त्यांचा बहुतांश वेळ कामाच्या ठिकाणी घालवतात आणि येथील सहकाऱ्यांमधून झालेले मित्र लागेल तो सल्ला देण्यासाठी नेहमीच जवळ असतात. टेलिव्हिजनच्या दुनियेत कलावंतही दिवसाचे अनेक तास सोबत शूटिंग करत वेळ घालवतात आणि अखेर त्यांची एकमेकांशी घट्ट मैत्री होते. अशा प्रकारची मैत्री झाली आहे सोनी सब वाहिनीच्या 'जिजाजी छत पर है' या मालिकेतील कलाकार हिबा नवाब (इलायची), निखिल खुराना (पंचम) आणि राशी बावा (सुनीता) यांच्यात. खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे बेस्ट फ्रेण्ड्स झाले आहेत.
आपल्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या या कलावंतांची ऑफ-स्क्रीन मैत्री अधिक घट्ट झाली आहे. ही मस्त तिकडी सेटवर जाम धमाल करत असते. मालिकेत एकमेकांचे मित्र असलेले हे तिघे प्रत्यक्ष आयुष्यातही अनेकदा एकत्र वेळ घालवताना किंवा पार्टी करताना दिसतात. ते एकत्र जमतात आणि सेटवर मस्ती करतात. या कलावंतांना एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास वाटतो. या मैत्रीबद्दल हिबा नवाब ऊर्फ इलायची सांगते, “आमची सर्वांची एकमेकांसोबत खूप छान मैत्री आहे. मित्र भोवताली असतील तर काम हे काम वाटत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातील आमच्या मैत्रीमुळे कॅमेरासमोर आम्ही अधिक चांगले काम करू शकतो. शूटिंगमधील ब्रेकदरम्यान आम्ही खूप मजा करतो आणि आमचा अवखळपणा कधी संपतच नाही.” त्यांच्या मैत्रीबद्दल राशी बावा ऊर्फ सुनीता सांगते, “हिबा आणि मी बेस्ट फ्रेण्ड्स आहोत आणि आम्ही एकमेकींना भेटलो, याबद्दल मला खूप आनंद वाटतो. निखिलशी माझी सुरुवातीला एवढी घट्ट मैत्री नव्हती पण कालांतराने आमच्यातील मैत्री वाढली आणि आता आम्हीही बेस्ट फ्रेण्ड्स आहोत. हिबा आणि निखिल मला माझ्या घरच्यांसारखे आहेत.” त्यांच्यातील या बंधाबद्दल निखिल खुराना ऊर्फ पंचम सांगतो, “हिबा आणि राशीसारख्या मैत्रिणी मिळाल्या हे माझे भाग्यच आहे. आमची मैत्री खूप विशेष आहे आणि ती मी कायम जपेन. आम्ही बरोबर असलो की सगळीकडे एकच धमाल उडते. त्यांच्यासोबत सेटवर खूप मजा येते. आम्ही शूटिंगदरम्यान आणि शूटिंग संपल्यावरही मजा करत राहतो. त्या दोघींसोबत वेळ खूप छान जातो.”

Also Read : जिजाजी छतपर हैं मालिकेला दादासाहेब फाळके अवॉर्डसमध्ये मिळाले हे पुरस्कार
Web Title: Read Jijaji is on the roof; Hiba Nawab, Rashi Bawa and Nikhil Khurana in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.