‘स्टार प्लस’वरील ‘नच बलिये-9’ या सेलिब्रिटींच्या नृत्यविषयक स्पर्धेत अभिनेता व नर्तक शंतनू माहेश्वरी याचा स्पर्धेची क्रिएटिव्ह टीम व परीक्षकांबरोबर खटके उडाले आहेत. उत्कृष्ट नर्तक आणि अनेक तरुणींचा आवडता नायक असलेल्या शंतनूने या कार्यक्रमात आपली जोडीदार नित्यामी शिर्के हिच्यावर आपले प्रेम जडल्याचे जाहीर केल्यावर असंख्य चाहत्या तरुणींची हृदये भंग पावली होती.

शंतनूने आतापर्यंत अनेक नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला असून त्याने ‘इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन- वर्ल्ड ऑफ डान्स’ हा किताबही जिंकला आहे.


मात्र आता ‘नच बलिये-9’ कार्यक्रमात त्याला आणि त्याच्या जोडीदाराला जे गुण मिळत आहेत, त्याबाबत शंतनू नाराज असल्याचे आमच्या कानावर आले आहे. हे परीक्षक इतर जोड्यांना झुकते माप देत असून आपल्या जोडीला योग्य व पुरेसे श्रेय मिळत नसल्याचे त्याचे मत बनले आहे.


परीक्षक रवीना टंडनला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा ती खूपच नाराज झाली. शंतनूला जर काही शंका होती, तर त्याने थेट आपल्याशी बोलायला हवे होते. पण तसे न करता त्याने आपल्या माघारी परस्पर सर्जनशील टीमकडे तक्रार केल्यामुळे रवीना नाराज झाली आहे.


या कार्यक्रमाच्या ताज्या भागासाठी चित्रीकरण करण्यापूर्वी मनाने हताश झालेल्या शंतनूला स्टेजच्या मागे आपले अश्रू आवरता आले नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले. या चर्चेला अजून विराम मिळालेला नाही; पण शंतनू व नित्यामी हे स्पर्धेतून बाहेर पडतील काय? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. पाहा ‘नच बलिये-9’ शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ravina Tandon gets angry on Shantanu Maheshwari ? This is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.