Raveena Tandon confesses that she had crush on Sanjay dutt in Nach Baliye 9 Show | रवीना टंडनचे होते बॉलिवूडच्या या अभिनेत्यावर क्रश, 'नच बलिए'मध्ये तिने दिली कबूली
रवीना टंडनचे होते बॉलिवूडच्या या अभिनेत्यावर क्रश, 'नच बलिए'मध्ये तिने दिली कबूली


आपल्याला कोण कलाकार आवडतो, याची कबुली सेलिब्रिटी कधी उघडपणे देत नसतात. पण नच बलिये ९च्या आगामी भागात परीक्षक रवीना टंडनने आपण पूर्वी कोणावर फिदा झाली होती, ते सांगितले आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून संजय दत्त होता. नच बलिये ९च्या येत्या वीकेण्डच्या भागात संजय दत्त सेलिब्रिटी अतिथी म्हणून सहभागी झाला आहे. या भागात रवीना टंडनने प्रेक्षक तसेच स्पर्धकांपुढे ही गोष्ट उघड करताच सर्वत्र एकच धमाल उडाली. संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी जमाने से क्या डरना, आतिश, विजेता यासारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत.


दरम्यान, या कार्यक्रमाचा सूत्रधार मनीष पॉल याच्याशी मिश्कील गप्पा मारताना संजय दत्तने त्याला संगितले की काही विशिष्ट बोली भाषांमध्ये तम्मा तम्मा या शब्दाचा अर्थ अतिशय परिपूर्ण व्यक्ती असा होतो. आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत संजूबाबा म्हणाला, “अरे बाबा मनीष, तू जर अतिशय परिपूर्ण व्यक्तींबद्दल बोलत असशील, तर रवीना इतकी दुसरी कोणतीच व्यक्ती परिपूर्ण असेल, असं मला वाटत नाही.”


 संजय दत्तने केलेल्या या स्तुतीमुळे रवीना लाजून लाल झाली आणि तिने संजयची ही प्रशंसा नम्रपणे स्वीकारली.


पण लवकरच उर्वशी ढोलकिया हिनेही आपण सुद्धा संजय दत्तवर कसे फिदा झालो होतो, ते सांगितले आणि मग रवीना व उर्वशी यांच्यात दोघी कशा संजयवर फिदा झाल्या होत्या हे सांगण्याची चढाओढच लागली.


Web Title: Raveena Tandon confesses that she had crush on Sanjay dutt in Nach Baliye 9 Show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.