पाहिला का रात्रीस खेळ चाले 3 चा प्रोमो, अण्णा नाईक म्हणतायेत परत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:48 PM2021-02-27T18:48:30+5:302021-02-27T18:52:35+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या या प्रोमोमध्ये काही लहान मुले विहिरीत डोकावून पाहात आहेत आणि अण्णा नाईक अशी हाक मारत आहेत.

ratris khel chale 3 promo viral on social media | पाहिला का रात्रीस खेळ चाले 3 चा प्रोमो, अण्णा नाईक म्हणतायेत परत येणार

पाहिला का रात्रीस खेळ चाले 3 चा प्रोमो, अण्णा नाईक म्हणतायेत परत येणार

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीस खेळ चाले या मालिकेच्या या प्रोमोमध्ये काही लहान मुले विहिरीत डोकावून पाहात आहेत आणि अण्णा नाईक अशी हाक मारत आहेत. त्यावर परत येणार असा विहिरीतून आवाज येत आहे. 

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची घोषणा झाल्यापासून ही मालिका कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या या प्रोमोमध्ये काही लहान मुले विहिरीत डोकावून पाहात आहेत आणि अण्णा नाईक अशी हाक मारत आहेत. त्यावर परत येणार असा विहिरीतून आवाज येत आहे. 

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून काही वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडली होती. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा, माई आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले होते. या मालिकेमुळे त्यांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले.

रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत.

 

Web Title: ratris khel chale 3 promo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.