ठळक मुद्देया मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी फक्कड बातमी आहे. होय, लॉकडाऊननंतर नव्या भागांसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणा-या या मालिकेच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. जुनी शनाया पुन्हा मालिकेत परतणार आहे.
राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांच्या भोवती फिरणा-या या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. म्हणजेच, तिचे मालिकेत पुन्हा एकदा कमबॅक होतेय.

हा मालिका सुरु झाली तेव्हा रसिका सुनील हिने शनायाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतली होती. मात्र शिक्षणासाठी परदेशात गेल्याने रसिकाने ही भूमिका अचानक सोडली होती. तिने मालिका सोडल्याने प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली होती. रसिकाने ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा इशा केसकरने घेतली होती.

 इशाने शनाया साकारताना कुठलीही कसर सोडली नव्हती. पण तिला शनाया म्हणून स्वीकारणे प्रेक्षकांना बरेच जड गेले होते. पण हळूहळू इशाला लोकांनी स्वीकारले. आता मात्र काही कारणास्तव तिने ही मालिका सोडल्याचे कळतेय आणि तिच्या जागी पुन्हा  सिका शनायाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मालिका व चित्रपटांचे शूटींग ठप्प पडले होते. आता मात्र सरकारने घालून दिलेल्या काही गाइडलाइन्ससह शूटींगला सुरुवात झाली आहे. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेच्या शूटींगलाही सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत मालिका नव्या भागांसह प्रसारित होणार आहे. अशात रसिका सुनीलचे कमबॅक प्रेक्षकांसाठी गोड सरप्राईज ठरणार आहे.
या मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rasika sunil will replace again isha keskar for shanaya in mazya navryachi bayko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.