बिग बॉस 13मध्ये सहभागी झाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई चर्चेत आली होती. या शोमध्ये रश्मीने अरहान खानवर प्रेम असल्याचंही जाहीर केले होते. अरहानचे लग्न झालेले असून त्याला मुल असल्याचे रश्मीला समल्यानंतर तिने अरहानसोबतच्या नात्याबाबत विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले आहे. बिग बॉस संपल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. रश्मी तिच्या प्रोफेशनल आणि पसर्नल लाईफला घेऊन नेहमी चर्चेत असते. आता रश्मी तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. रश्मीने डेटवर जायचा प्लॅन केला आहे. रश्मीला अंडरवॉटर हॉटेलमध्ये डेटवर जायचे आहे. आता रश्मीला डेटवर नक्की कोणासोबत जायचे आहे हे फक्त रश्मी सांगू शकते. 

रश्मी देसाई आज छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेय.

‘उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह रश्मीने भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली.

‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. पण वर्षभरातच या रश्मी व नंदिशच्या कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत.
 

Web Title: Rashmi desai is ready to go on date shared a under see restaurant image on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.