झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

झी चोवीस तासच्या वृत्तानुसार, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर नुकताच एक फाइट सीक्वेन्स शूट करण्यात आला. यात राणाला खूप मारलेले दिसत आहे. सेटवर अशी कुजबूज ऐकायला मिळत होती की राणा दा मरणार आहे. खरंच राणा मरणार आहे का? राणा म्हणजे हार्दिक जोशी शूटिंग संपवून मुंबईला परतल्याचे समजते आहे. फाइट सीन हा राणाचा मालिकेतला शेवटचा सीन होता असे देखील समोर आले आहे. शूटींग संपल्यानंतर परत जाताना त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. त्यामुळे या मालिकेतून राणा दा याचे पात्र खरोखरंच संपतंय का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


तुझ्य़ात जीव रंगला ही मालिका ही आज घरोघरी पोहोचली आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीचा मोठा फॅन फॉलोवर आहे. पण आता राणा दा मालिकेत मरणार आहे ? यामुळे अनेक चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे.


तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा दा यांच्या शिवाय बरकत, नंदिता, चंदे ही पात्रे देखील लोकप्रिय झाली. अंजली आणि राणा यांची ही लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली.

मात्र आता राणादाची एक्झिट होणार असल्याचे समजल्यावर प्रेक्षक नाराज झाले आहेत. मात्र हे चित्र लवकरच आगामी भागात उलगडेल.

Web Title: Ranada exit from Tuzyat Jeev Rangala Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.