Rakhi sawant says she wants to have a baby but she does not need a vicky donor | राखी सावंतला व्हायचं आई, पण म्हणाली- मला विकी डोनरची गरज नाही

राखी सावंतला व्हायचं आई, पण म्हणाली- मला विकी डोनरची गरज नाही

राखी सावंत 'बिग बॉस 14' च्या घरात चांगलाच धुमाकुळ घालताना दिसली.  बिग बॉसमध्ये राहुल वैद्य, रुबीना दिलाइक, निक्की तांबोळी आणि अली गोनी यांच्यासमवेत राखीने अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरी गाठल्यानंतर राखी शेवटच्या क्षणी 14 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली. आता राखी सावंतला तिच्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आता तिला आई व्हायची इच्छा आहे.

राखीला सिंगल मदर व्हायचे नाही
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राखी म्हणाली की, तिला पती रितेशबरोबर मुलाचे संगोपन करायचे आहे. ती म्हणाले, 'मातृत्व जाणून घेणे ही माझी प्रायॉरिटी आहे.  मला माझ्या मुलासाठी कोणत्या विकी डोनरची गरज नाही, मला एका वडिलांची गरज आहे. मला सिंगल मदर व्हायचं नाही. मला नाही माहिती हे कसं होईल पण असचं होईल याची मला आशा आहे. मी माझं एग्ज फ्रिजिंग करुन ठेवलं आहे. 

राखीच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात  कारण आजपर्यंत तिचा पती कधी दिसला नाही किंवा राखी ही कधी तिच्या पतीबरोबर  दिसली नाही. पण राखी कायम ती वैवाहिक असल्याचे सांगते. ती म्हणाला, 'रितेश अस्तित्त्वात आहे. मी त्याच्याशी लग्न केले आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. तो एक मोठा उद्योगपती आहे ज्याच्या हाताखाली बरेच लोक काम करतात. '
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rakhi sawant says she wants to have a baby but she does not need a vicky donor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.