rakhi sawant mom undergoing cancer treatment actress shared pic after evicting the bigg bos 14 finale | माझ्या आईसाठी प्रार्थना करा...! राखी सावंतच्या आईला कॅन्सर, फोटो पाहून बसेल धक्का

माझ्या आईसाठी प्रार्थना करा...! राखी सावंतच्या आईला कॅन्सर, फोटो पाहून बसेल धक्का

ठळक मुद्देबिग बॉस 14 मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली.

‘बिग बॉस 14’मध्ये संपूर्ण देशाला एंटरटेन करणारी राखी सावंत व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करतेय. बिग बॉसच्या घरातही तिने अशा अनेक गोष्टींचा, अडचणींचा खुलासा केला होता. तेव्हा लोकांनी राखी इमोशनल कार्ड खेळत असल्याचे म्हटले होते. पण तसे नव्हतेच. राखीची आई कॅन्सरशी लढतेय. राखीने स्वत: ही माहिती दिली.
मंगळवारी रात्री उशीरा राखी सावंत आईचे दोन फोटो पोस्ट केले. यात तिची आई अतिशय आजारी दिसतेय. माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत, असे लिहित राखीने ही पोस्ट केली. 

राखीने शेअर केलेले हे फोटो पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटावा. राखीचे चाहतेही हे फोटो पाहून भावूक झालेत. अनेकांनी राखीच्या आईसाठी प्रार्थना केली. याचवेळी अनेकांनी राखीच्या हिंमतीचीही दाद दिली. व्यक्तिगत आयुष्यात इतक्या अडचणी असूनही राखीने कायम लोकांचे मनोरंजन केले, असे लिहित चाहत्यांनी तिचे कौतुक केले.

बिग बॉस 14 मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रूपये घेऊन राखीने शो सोडला होता. हे पैसे आईच्या उपचारासाठी  खर्च करणार असल्याचे तिने म्हटले होते. या पैशातून मी आईच्या हॉस्पीटलचे बिल भरेल, असे ती म्हणाली होती.  राखीला शोमध्ये सपोर्ट करण्यासाठी आलेल्या बिंदूनेही राखी जिंकणार नसल्याचे आधीच सांगितले होते. त्यामुळे जी रक्कम तिच्या वाट्याला येईल ते स्विकारुन शोमधून बाहेर पडण्याचा सल्ला राखीला दिला होता. बिंदूने राखीला दिलेला कानमंत्र तिने आतोनात पाळला.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rakhi sawant mom undergoing cancer treatment actress shared pic after evicting the bigg bos 14 finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.