अर्ध्या रात्री एअरपोर्टवर राहुल वैद्य-दिशा परमारचा ‘इश्क वाला लव्ह’, लोक म्हणाले, फुल्ल ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:51 PM2021-05-07T12:51:39+5:302021-05-07T12:52:19+5:30

Rahul Vaidya left for Khatron Ke Khiladi 11 : बाहेर कॅमेरे लखलखत होते आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले राहुल व दिशाला निरोपाचा क्षण जवळ येताच आपल्या भावना रोखता येत नव्हत्या.

rahul vaidya left for taking part in khatron ke khiladi disha parmar said please do not go | अर्ध्या रात्री एअरपोर्टवर राहुल वैद्य-दिशा परमारचा ‘इश्क वाला लव्ह’, लोक म्हणाले, फुल्ल ड्रामा

अर्ध्या रात्री एअरपोर्टवर राहुल वैद्य-दिशा परमारचा ‘इश्क वाला लव्ह’, लोक म्हणाले, फुल्ल ड्रामा

Next
ठळक मुद्देराहुलने ‘बिग बॉस 14’च्या घरात दिशाला प्रपोज केले होते. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे.

तर ‘बिग बॉस 14’मुळे कधी नव्हे इतका लोकप्रिय झालेला सिंगर राहुल वैद्यखतरों के खिलाडी 11’साठी केपटाऊनला रवाना झालाये.  त्यापूर्वी राहुलला निरोप देताना  दिशा परमार भावुक झालेली दिसली. गुरुवारी अर्ध्या रात्री राहुलला विमानतळावर सोडण्यासाठी आलेली दिशा प्रियकराला सोडायला तयार नव्हती आणि राहुल कसाबसा तिला समजावत होता. कधी तिला मिठीत घेऊन, कधी तिला लाडाने कुरवाळत तिची समजूत घालत होता. बाहेर कॅमेरे लखलखत होते आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले राहुल व दिशाला निरोपाचा क्षण जवळ येताच आपल्या भावना रोखता येत नव्हत्या.

कारमध्ये राहुलने दिशाला घट्ट मिठी मारली. तिच्या माथ्याचे चुंबन घेतले, तिचा गालगुच्चा घेतला.
राहुल व दिशा एअरपोर्टवर कारबाहेर निघाले आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. यानंतर राहुलने गुडघ्यावर बसून दिशाला पुन्हा एकदा प्रपोजही केले.   दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला आणि राहुल केपटाऊनसाठी रवाना झाला.

राहुल व दिशाचे विमानतळावरचे हे व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
राहुलने ‘बिग बॉस 14’च्या घरात दिशाला प्रपोज केले होते. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत दिशा व राहुल यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले. यावेळी दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली.

लोक म्हणाले, ड्रामा


विमानतळावर एकमेकांना निरोप देताना राहुल व दिशाची झालेली अवस्था निव्वळ ड्रामा असल्याचे म्हणत, अनेकांनी सोशल मीडियावर या कपलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी हा प्रेमाचा दिखावा नुसता ड्रामा आहे, हे सर्व कॅमे-यासाठी आहे, अशा कमेंट्स अनेक लोकांनी दिल्यात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rahul vaidya left for taking part in khatron ke khiladi disha parmar said please do not go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app