राहुल महाजनसह 2010 मध्ये डिंपीने लग्न केले होते. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायला लागले. अखेर 2015 मध्ये त्यांच्या नात्याला पूर्णविराम देत वेगळे झाले. बिग बॉस कंटेस्टंट राहुल महाजनची एक्स वाईफ डिंपी गांगुलीने राहुल महाजनपासून वेगळी झाल्यानंतर 2015 मध्ये रोहित रॉयसह लग्न केले. रोहित हा दुबईमध्ये राहत असून तो व्यावसायिक आहे. 


लग्नानंतर डिंपी आता पती रोहितसह दुबईमध्ये स्थायिक झाली. आता ती संसारात रमली असून लाइमलाइटपासून लांबच राहणे पसंत करते. आता पुन्हा डिंपी चर्चेत आली आहे. डिंपी दु-यांदा बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. डिंपीला तीन वर्षाची मुलगी आहे. डिंपी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिच्या आयुष्यातील खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते.  डिंपी पहिल्यांदा आई झाली तेव्हाही तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मुलीसोबत आपला फोटो शेअर करताना तिने लिहिले की, दुसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे.

तसेच राहुल महाजननेही तिस-यांदा लग्न करत त्याच्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. नताल्या लिना या मॉडेलसोबत त्याने लग्न केले आहे. नताल्या माझी जोडीदार म्हणून अगदी योग्य असल्याचे जाणवले.नताल्या हिंदू नसली तरी हिंदु रितीरिवाज खूप आवडतात. असे त्याने त्याची पत्नी नताल्याविषयी सांगितले होते. आता राहूल महाजनच्याही लग्नाला वर्ष ओलांडले असून तो ही कित्येकदिवस चर्चेत नाही. 

Web Title: Rahul Mahajan's Ex-Wife Is Dimpy Ganguly is pregnant with second child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.