A. R. Rehman on the stage of 'Indian Idol 12' said, "I listen to the songs of this contestant in my sleep." | ए. आर. रेहमान 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर, म्हणाले- 'निवांत वेळेत ऐकतो या स्पर्धकाची गाणी'

ए. आर. रेहमान 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर, म्हणाले- 'निवांत वेळेत ऐकतो या स्पर्धकाची गाणी'

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या शोमध्ये प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेता ए आर रहमान हजेरी लावणार आहे. स्पर्धकांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेत घेत रहमान काही रोचक किस्से देखील सांगणार आहेत. दुसरीकडे, ऋत्विक धनजानी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसेल आणि परीक्षक आणि स्पर्धकांना बोलते करून कार्यक्रमाची रंगत वाढवेल.
 
कार्यक्रमात गप्पांच्या ओघात ऋत्विकने ए आर रहमान यांना विचारले की, मोकळा वेळ असताना त्यांना कोणत्या प्रकारची गाणी ऐकायला आवडते? त्यावर रहमानने उत्तर दिले, “मी जेव्हा दमलेला असतो किंवा माझ्याकडे निवांत वेळ असतो, तेव्हा मी अंजली आणि तिची बहीण नंदिनी यांची शास्त्रीय गीते ऐकतो. मी त्यांना यूट्यूबवर ऐकले आहे आणि अंजलीने तर माझ्या सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटात आवाज देखील दिला आहे.” तसेच ए.आर. रहमान यांनी त्या दोघींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


त्याबद्दल युवा गायिका अंजली म्हणाली, “सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटासाठी ए आर अमीन सोबत ‘मर्द मराठा’ सारखे गाणे म्हणायची संधी मला मिळाली हा मी माझा गौरव मानते. संगीताचे साक्षात दैवतच आज मंचावर अवतरले आहे, हे आमच्यासाठी वरदानच आहे. आणि इतक्या मोठ्या मंचावरून ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. या कौतुकामुळे मी भारावले आहे आणि गाण्याच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करून अशा आणखी संधी मिळवण्यासाठी मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले आहे.”


 इंडियन आयडॉलचा १२वा सीझन रात्री ९.३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहा.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A. R. Rehman on the stage of 'Indian Idol 12' said, "I listen to the songs of this contestant in my sleep."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.