Pyaar Ke Papad serial completed 100 episodes | ‘प्यार के पापड’ने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा

‘प्यार के पापड’ने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा

‘स्टार भारत’वरील ‘प्यार के पापड’ या लोकप्रिय मालिकेने नुकतेच आपले 100 भाग प्रसारित केले. मालिकेत आशय मिश्रा आणि स्वरदा ठिगळे हे अनुक्रमे ओंकार आणि शिविका या नायक-नायिकेच्या भूमिका साकारीत आहेत. या मालिकेच्या प्रसारणाला यंदा फेब्रुवारीत प्रारंभ झाला असून तेव्हापासून तिच्या लोकप्रियतेचा आलेख वाढताच राहिला आहे. या दोघांशिवाय अखिलेंद्र मिश्रा हे नामवंत अभिनेतेही शिविकाचे वडील त्रिलोकीनाथच्या भूमिकेत महत्त्वाच्या आहेत.

या मालिकेच्या 100 व्या भागाचे प्रसारण झाल्यानंतर मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचार्‍्यांनी सेटवरच एक जल्लोष पार्टी केली आणि मोठा केक कापला. मालिकेच्या निर्मात्यांनी सर्व कलाकार आणि कर्मचार्‍्यांना अनपेक्षितपणे एक पार्टी देऊन सुखद आश्चर्याचा धक्का दिला.

मालिकेच्या सध्याच्या कथाभागात ओंकार आणि शिविकाचा विवाह पार पडला असून ओंकार तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतो. प्रेक्षकांमध्ये या मालिकेच्या कथेबद्दल अतिशय उत्सुकता असून या मालिकेला भविष्यातही यशाचे असे अनेक महत्त्वाचे टप्पे पार करण्याची संधी मिळेल, यात शंका नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pyaar Ke Papad serial completed 100 episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.