ठळक मुद्देप्रतीशने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ सारख्या मालिकेतही काम केले आहे. सध्या तो ‘प्यार का पापड’मध्ये बिझी आहे.

टीव्ही शो ‘प्यार के पापड’चा अभिनेता प्रतीश वोरा मुलीच्या निधनाच्या धक्क्यातून अद्यापही सावरलेला नाही. गत ७ मे रोजी प्रतीशच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही चिमुकली एका खेळण्यासोबत खेळत होती. खेळता खेळता तिने हे खेळणे गिळले आणि यातच तिचा प्राण केला. प्रतीशने अलीकडे या घटनेबद्दल सांगितले. या अपघाताबद्दल सांगताना त्याला अश्रू अनावर झालेत.

त्याने सांगितले की, आम्ही घरी पिज्जा खात होतो. माझे काही मित्रही आले होते. माझी पत्नी माझ्यासोबत मुंबईला राहत नाही. ती राजकोटला राहाते. काही दिवसांसाठी ती व माझी मुलगी या दोघी मुंबईत आल्या होत्या. माझ्या मुलीने खेळणे गिळले तेव्हा लगेच मी ते काढण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तिने माझ्या हाताला चावा घेतला. खेळणे तिच्या घशात अडकले होते. अगदी काही क्षणात हे सगळे घडले. मी व माझी पत्नी तिला मुंबईच्या मीरा रोडच्या हॉस्पीटलकडे घेऊन धावलो. शक्य तितक्या लवकर आम्ही हॉस्पीटलमध्ये पोहोचलो. पण तोपर्यंत माझ्या मुलीच्या तोंडातून रक्त येणे सुरु झाले होते. डॉक्टरने रक्त थांबवले. पण तिच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते. आॅक्सिजनचे प्रमाण ठीक होते. पण कार्बन डायआॅक्साईडचे उत्सर्जन होत नव्हते. काही वेळानंतर ती नॉर्मल आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. पण तरीही तिला २४ ते ४८ तास अंडर आॅबर्जर्वेशन ठेवण्यात आले होते. याचदरम्यान तिच्या तोंडातून पुन्हा रक्तस्राव सुरु झाला. हृदयाचे ठोके पुन्हा अनियमित झाले.

रात्री १ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण ती आम्हाला कायमची सोडून गेली. मी माझ्या डोळ्यांनी तिचा मृत्यू बघितला. या धक्क्यातून सावरणे कठीण आहे. पण याक्षणाला मी रडूही शकत नाही. कारण मला माझ्या पत्नीला धीर द्यायचा आहे, असे प्रतीशने सांगितले.
प्रतीशने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ सारख्या मालिकेतही काम केले आहे. सध्या तो ‘प्यार का पापड’मध्ये बिझी आहे. यात तो नंदू गुप्ताची भूमिका साकारतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pyaar ke papad actor pratish vora opens up on tragic death of his 2 year old daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.