ठळक मुद्देनच बलियेचे विजेतेपद मिळाल्यानंतर युविका आणि प्रिन्स त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

नच बलिये या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता गेल्या काही महिन्यांपासून सगळ्यांना लागली होती. तीन महिने प्रेक्षकांना नच बलियेमधील सेलिब्रेटी जोडींचे एकाहून एक सरस नृत्य पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील सगळ्याच जोड्या खूप चांगल्या असल्याने यातील विजेता कोण ठरणार याचा अंदाज लावणे देखील कठीण झाले होते. युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे नच बलियेच्या नवव्या सिझनचे विजेते ठरले आहेत.

नच बलिये ९ या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे प्रक्षेपण होण्याआधीच या कार्यक्रमाचा विजेता कोण असणार हे सगळ्यांना कळले आहे. कारण या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर ट्रॉफी स्वीकारताना युविका आणि प्रिन्स यांचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. या फोटोत अभिनेता गोविंदा त्यांना ट्रॉफी देताना दिसत आहे. तसेच या फोटोत आपल्याला रवीना टंडन देखील दिसत आहे. 

तसेच नच बलियेचे विजेतेपद मिळाल्यानंतर युविका आणि प्रिन्स त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

प्रिन्स आणि युविका विजेते ठरले आहेत तर अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डी उपविजेते ठरले आहेत. रवीना टंडन, अहमद खान यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. 

Web Title: Prince Narula and Yuvika Chaudhary's winning moment video from Nach Baliye 9 gets leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.