सगळ्‌यांनाच चांगली प्रेमकथा नक्कीच आवडते आणि लवकरच  नव्या सीझनमध्ये नव्या युगातील प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या नव्या सीझनमध्ये  युवा पिढी कुठल्या विभिन्न परिस्थिती आणि संभ्रमातून जाते ते दिसून येईल.

या सीझनमधून आजच्या या तरूण पिढीसाठी प्रेम म्हणजे काय असतं हे दाखवण्यात आले आहे. या कल्पनेला अतिशय प्रेक्षकांचे पाठबळ लाभले असून ही पिढी प्रेमामधील संभ्रमाला कशाप्रकारे हाताळत आहे आणि यातून वाट काढण्यासाठी काय काय मार्ग अवलंबत आहे हे दाखवण्यात येईल. ‘प्यार तूने क्या किया’च्या नव्या सीझनमधील एका एपिसोडमध्ये 'इश्क सुभान अल्ला फेम ईशा सिंगची प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या कार्यक्रमाचा हिस्सा बनताना ईशा सिंग अतिशय उत्साहात असून ती म्हणाली, “प्यार तुने क्या किया हा एक सुंदर कार्यक्रम माझ्या वाट्‌याला आला असून मी त्याला नाही म्हणूच शकले नाही. या नव्या सीझनसाठी मी उत्सुक आहे कारण यात युवा पिढीच्या आयुष्यात प्रेमाचे काय स्थान आहे आणि ते त्याला हाताळण्यासाठी काय काय करतात ते दाखवण्यात येणार आहे. 

यात माझी प्रीत ही व्यक्तिरेखा अतिशय सकारात्मक, अगदी फूडी आहे आणि सगळ्‌यात महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्तिरेखा आपल्या मनाचे ऐकून आयुष्यात आनंदी कसे राहता येते ते दाखवते. माझी व्यक्तिरेखा प्रीतचा परिवार राजस्थानी आणि पंजाबी असा मिक्स आहे.

एपिसोडची संकल्पना आणि कथा यांच्याबाबत म्हणायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीशी ती अगदी मिळतीजुळती आहे. एकूणच, हा माझ्यासाठी अतिशय वेगळा आणि रंजक अनुभव होता आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना तो निश्चितपणे आवडेल.”

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The popular Actress Eisha Singh will be a part of the 11th season of 'Pyaar Tune Kya Kiya', she is working hard for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.