ठळक मुद्देपूजा ही झी मराठी वाहिनीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील मदनची म्हणजेच विजय आंदळकरची पत्नी आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील किती सांगायचंय मला या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत पूजा पुरंदरेला पाहायला मिळाले होते. पूजा ही झी मराठी वाहिनीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील मदनची म्हणजेच विजय आंदळकरची पत्नी असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्या लग्नाला दोन वर्षं झाले असून त्यांचे कपल खूपच क्यूट आहे. 

पूजा आणि विजय यांनी मार्च 2017 मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर काहीच महिन्यात म्हणजेच 23 नोव्हेंबरला ते दोघे लग्नबंधनात अडकले. विजय व्यवसायाने वकील असला तरी त्याने ढोल ताशे, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, 702 दिक्षित यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. सध्या लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील त्याच्या भूमिकेला तर प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. 

पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून त्याचे फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. या फोटोत ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. पूजाच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला विजयसोबतचे देखील अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडत असल्याचे त्यांचे फॅन्स त्यांना आवर्जून सांगतात. 

Web Title: Pooja Purandare is married to lagnachi wife wedding bayko fame Vijay Andalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.