छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूत यांची जोडीसुद्धा लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील काही कलाकारांचे रियुनियन झालं. गणपती-गौरी पूजनाच्या निमित्ताने ‘पवित्र रिश्ता’ची गर्लगँग प्रार्थना बेहरे, अंकिता लोखंडे आणि प्रिया मराठे या तिघीही एकत्र आल्या.

अंकिता, प्रार्थना व प्रिया या तिघींमध्ये आताही पूर्वीसारखीच मैत्री कायम आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अंकिताने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बिझी शेड्युलमधून वेळ काढून हे कलाकार एकमेकींची आवर्जून भेट घेतात. प्रार्थनाने मालिकेत अंकिताच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सुशांत व अंकिता दोघेही घराघरात पोहोचली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने छोट्या पडद्यावर सगळ्यांना भुरळ पाडली होती. ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी चांगली होती की, पर्सनल लाईफमध्येही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दिवसागणिक त्यांचे प्रेम बहरले.  दोघेही लग्न करणार होते. पण काही कारणास्तव त्या दोघांचे ब्रेकअप झाले. 


या मालिकेनंतर सुशांत ‘काय पो छे’ आणि ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, केदारनाथ, सोनचिरैया या चित्रपटात झळकला तर अंकितानेही कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेल्या मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

तसेच प्रार्थना बेहरे चित्रपटात सध्या काम करतेय तर प्रिया मराठे मालिकेत काम करत आहे. 

Web Title: Pavitra Rishta serial team reunion on Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.