पवित्र पुनिया आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. पण ती पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत असते. 'बिग बॉस 14' मध्ये पवित्र आणि एजाज खानमध्ये  जवळीक वाढली होती आणि दोघांचा रोमान्स देखील पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरात सुरु झालेले पवित्रा आणि एजाजचं नातं किती दिवसं टिकतं हे वेळचं आपल्याला सांगेल. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार पवित्राचा पूर्व पती सुमित माहेश्वरी याने धक्कादायक खुलासे केले आहेत. 


एका मुलाखती दरम्यान सुमित माहेश्वरीने असा दावा केला की, त्याचा आणि पवित्र पुनियाचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. पण लग्नानंतर पवित्राने त्याचा ४ वेळा विश्वासघात केला आहे.

लग्नानंतरही या लोकांसोबत होती पवित्रा रिलेशनशीपमध्ये 
सुमित म्हणाला की, लग्नानंतरही पवित्रचे पारस छाबडा, प्रतीक सहजपाल आणि दुसरी एका व्यक्तीसोबत अफेअर होते. पण त्याने प्रत्येक वेळी पवित्राला माफ केले.

सुमित माहेश्वरीने दावा केला की, शोमध्ये पवित्राने एजाज खानचा वापर करुन घेतला. सुमित म्हणतो पवित्राचा मनं चांगलं आहे पण तिच्या सवयींमुळे  त्याच्या कुटुंबालाही अनेकदा दु:खी व्हाव लागलं आहे. तो  पुढे म्हणाले की, घटस्फोट घेतल्यानंतर पवित्र एजाज खानसोबतचं तिचं रिलेशनशीप सुरु ठेऊ शकते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pavitra punia ex husband says they are still married and pavitra can continue with eijaz only after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.