मराठी इंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार असणार बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:46 PM2021-06-23T16:46:12+5:302021-06-23T16:49:17+5:30

बिग बॉस 3 ची घोषणा झाल्यानंतर आता या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

pallavi patil, sangram samel and neha joshi in bigg boss marathi season 3? | मराठी इंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार असणार बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक?

मराठी इंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार असणार बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक?

Next
ठळक मुद्देमहेश मांजरेकर यांनी काल या कार्यक्रमाचा टीझर शेअर करत त्यासोबत लिहिले होते की,  त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सिझन सगळे गाजले आहेत. आता या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीच सोशल मीडियाद्वारे या गोष्टीविषयी नुकतेच सांगितले आहे.

महेश मांजरेकर यांनी काल या कार्यक्रमाचा टीझर शेअर करत त्यासोबत लिहिले होते की,  त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर... त्यांची ही पोस्ट वाचून बिग बॉसचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आम्ही आतुरतेने या सिझनची वाट पाहत आहोत असे लोक सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

बिग बॉस 3 ची घोषणा झाल्यानंतर आता या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नेहा जोशी आणि संग्राम समेळ बिग बॉसच्या या सिझनमध्ये झळकणार असल्याची चर्चा असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. तसेच संग्रामसोबतच त्याची पहिली पत्नी पल्लवी पाटील देखील बिग बॉस मराठीचा भाग असणार असल्याची शक्यता या वृत्तात मांडण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pallavi patil, sangram samel and neha joshi in bigg boss marathi season 3?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app