In the opposite story of Tarak Mehta, Babita in the series, ie Munmoon Dutta, was involved with the actress ... due to continuous assault | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता होती या अभिनेत्यासोबत नात्यात... सततच्या मारहाणीमुळे केले होते ब्रेकअप

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता होती या अभिनेत्यासोबत नात्यात... सततच्या मारहाणीमुळे केले होते ब्रेकअप

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बबिताची व्यक्तिरेखा साकारणारी मुनमुन दत्ता ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेमुळे मुनमुनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आज प्रेक्षक तिला बबिता म्हणूनच ओळखतात. मुनमुन ही सध्या सिंगल असून तिच्या आयुष्यात प्रचंड खूश आहे. तुम्हाला माहीत आहे का, अनेक वर्षांपूर्वी ती एका अभिनेत्यासोबत नात्यात होती आणि या अभिनेत्याने तिला अनेक वेळा मारहाण देखील केली होती. याच मारहाणीला कंटाळल्यामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला होता.
अरमान कोहली आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला होता. अरमानने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. त्याने काही वर्षांपूर्वी प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केले होते. पण त्याच्या अभिनयाची तितकीशी चर्चा झाली नाही. अरमान हा सर्वात जास्त प्रसिद्ध बिग बॉस या मालिकेमुळेच झाला. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते आणि त्या दोघांचे प्रेमप्रकरण चांगले गाजले देखील होते. पण तुम्हाला माहीत आहे का, तनिषा सोबत अफेअर होण्याआधी अरमान आणि मुनमुन हे नात्यात होते. अरमान आणि मुनमुन यांचे प्रेमप्रकरण २००८ साली सुरू झाले होते. पण काहीच काळात त्यांचे ब्रेक अप झाले. अरमानच्या रागीट स्वभावामुळे मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला होता. 

munmun dutta armaan kohli

अरमानने अनेकवेळा रागाच्या भरात मुनमुनवर हात उचलला असल्याचे म्हटले जाते. ही गोष्ट अभिनेत्री डॉली बिंद्राला देखील माहीत होती. मुनमुनच्या या वाईट काळात डॉलीच मुनमुनच्या पाठिशी उभी राहिली होती. अरमान मुनमुनवर रागाच्या भरात अनेकवेळा हात उचलत असल्याने मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेक अप केले असल्याचे म्हटले जाते. 

Also Read : ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यात झाली भांडणं?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In the opposite story of Tarak Mehta, Babita in the series, ie Munmoon Dutta, was involved with the actress ... due to continuous assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.