one girl blocked 'Swarajya Rakshak Sambhaji' fame Amol Kolhe's road, Kolhe getting emotional | एका चिमुरडीनं अडवला 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अमोल कोल्हेंचा रस्ता, या गोष्टीमुळे झाले भावूक
एका चिमुरडीनं अडवला 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम अमोल कोल्हेंचा रस्ता, या गोष्टीमुळे झाले भावूक


झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता ही मालिका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. संभाजी राजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हेंवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाचाच अनुभव कोल्हेंनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

डॉ अमोल कोल्हेंनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मतदार संघातील एका चिमुरडीची गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका माझ्या घरी चला. नाहीतर ते तुम्हाला पकडतील. मी निशःब्द कृतकृत्य! 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या संभाजी राजेंवर शत्रू चालून येतात हा अखेरचा टप्पा दाखवण्यात येत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. 


काही दिवसांतच स्वराज्य रक्षक संभाजी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Web Title: one girl blocked 'Swarajya Rakshak Sambhaji' fame Amol Kolhe's road, Kolhe getting emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.