OMG: Mazhya Navryachi Bayko Starcast Video On Biggini Shoot | OMG: 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील कलाकारांंनी केले "बिगीनी शूट', video Viral

OMG: 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील कलाकारांंनी केले "बिगीनी शूट', video Viral

छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'माझ्या नव-याची बायको'  अल्पावधीतच ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना 
कायमच भावली.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. अभिनयाव्यतिरिक्तही कलाकार मंडळी कामातून ब्रेक मिळताच सेटवर मनसोक्त मजा करताना दिसतात. 


कधी क्रिकेट खेळतात तर कधी आपल्या आवडीच्या पदार्थांवर ताम मारतात. याच मालिकेच्या कलाकारांनी कामातून मिळालेल्या ब्रेकमध्ये एक भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओ मजेशीर असून संस्कारी बिगीनी शूट असे कॅप्शन देत खुद्द अभिजित खांडकेकरनेच तो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर होताच अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंटस देत पसंती दिली आहे. एकंदरितच मालिकेतील कलाकारांची टीम रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजारामची 'नो ब्रेकिंग न्यूज', जाणून घ्या काय आहे ही भानगड

शर्मिला राजाराम शिंदे ही व्हायरस मराठी या युट्युब चॅनेलवरील 'नो ब्रेकिंग न्यूज' या नव्या शोमध्ये वृत्तनिवेदिकेची भूमिका करत आहेत.वृत्तनिवेदकाच्या वेगवेगळ्या शैलीचे प्रहसन करणारी, आणि न्यूज चॅनल वर दिल्या जाण्याऱ्या बातम्यांचे व्यंग करत विनोद निर्मिती करणारी 'नो ब्रेकिंग न्यूज' ही वेब मालिका सुरू झाली आहे. सादरीकरणाची पद्धत आणि त्यातला तोच तोचपणा याला कंटाळून चक्क बातम्या देताना तांदूळ निवडण्याचे काम शर्मिला राजाराम यांनी केले.

कंटाळवाण्या बातम्यांमध्ये रंग भरण्यासाठी शर्मिलाने चक्क तांदूळ निवडत बातम्या दिल्या आहेत. हा शो आणि तिची वृत्तनिवेदनाची पद्धत प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.मराठी आणि न्यूज विश्वात ज्या पद्धत्तीने बातम्या दिल्या जातात,त्या बातम्यांचे विषय या सगळ्यावर विनोदी पद्धतीने ही मालिका भाष्य करते. निवेदनाच्या आणि सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे या मालिकेला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG: Mazhya Navryachi Bayko Starcast Video On Biggini Shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.