स्टार प्लस वाहिनीवरील डान्स रिएलिटी शो नच बलिए ९च्या नुकत्याच एका भागात अभिनेत्री हिना खानने हजेरी लावली होती. यावेळी तिने विशाल, प्रिन्स, शंतनू आणि अली या स्पर्धकांना या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर साडी नेसायला भाग पाडले.

देशातील सेलिब्रिटी जोडप्यांच्या नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम असलेल्या नच बलिये ९ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी श्रद्धा आणि आलम या जोडीने एक अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला. यावेळी श्रद्धाने एक सुंदर साडी नेसली होती आणि ‘साडी के फॉल सा कभी मॅच किया रे’ या गाण्यावर तिने हे नृत्य केले. या देखण्या जोडीची प्रशंसा केल्यावर परीक्षक रवीना टंडनने म्हटले, “हा फारच सुंदर डान्स होता.

मी ही गोष्ट खात्रीने सांगू शकते की साडी नेसून नृत्य करणं ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे कारण मी स्वत: ते अनेक चित्रपटांतून केलं आहे. कधी कधी तुम्हाला साडी नेसून काही कठीण पदन्यास करावे लागतात आणि ती सोपी गोष्ट नसते. श्रद्धाने खरंच एक उत्तम नृत्य केलं असून आलमनेही तिला चांगली साथ दिली.”


रवीनाच्या या मतावर हिना खानने सहमती दर्शविली आणि तेव्हा तिला एक भन्नाट कल्पना सुचली. तिने सांगितले की या स्पर्धेतील पुरुष स्पर्धकांना साडी नेसवून नृत्य करण्यास सांगितले पाहिजे म्हणजे साडीत नृत्य करणे किती अवघड असते, त्याची त्यांना कल्पना येईल.

तेव्हा शंतनू, विशाल, प्रिन्स आणि अली या चारही स्पर्धकांना तात्काळ व्यासपिठावर पाचारण करण्यात आले आणि त्यांना चार साड्या नेसण्यासाठी देण्यात आल्या. सुरुवातीला त्यांना नीट साडी नेसता येईना, पण अखेरीस त्यांनी कशीतरी साडी अंगाभोवती गुंडाळली. पण इतक्याने सारे झाले नाही. त्यांना साडी नेसून नृत्य करण्यास सांगण्यात आले आणि मग त्यातून सर्वात चंगले नृत्य कोणी केले, ते ठरविण्यात आले. शंतनू सोडल्यास उर्वरित तिघा पुरुष स्पर्धकांना ना साडी नीट नेसता आली, ना त्यांना नृत्य करता आले. नच बलियेच्या मंचावर चाललेली ही धमाल पाहून प्रेक्षक आणि परीक्षक यांची हसता हसता पुरेवाट झाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG! Hina Khan attented Nach Baliye 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.