आता या भाषेतही पहाता येणार 'तारक मेहता का उल्टा चष्मा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 07:15 AM2019-12-22T07:15:00+5:302019-12-22T07:15:00+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

 Now Tarak Mehta Ka Ulta Chashma can also be seen in Marathi language | आता या भाषेतही पहाता येणार 'तारक मेहता का उल्टा चष्मा'

आता या भाषेतही पहाता येणार 'तारक मेहता का उल्टा चष्मा'

googlenewsNext


नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका आता मराठीत सादर करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यापासून ‘फक्त मराठी या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी' म्हणून प्रसारित होणारा हा शो मूळचा डब व्हर्जन असेल. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील या शो प्रती असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, या प्रॉडक्शन हाऊसने मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रादेशिक भाषेत भारताच्या सर्वात आवडत्या कॉमेडी शोचा स्वाद देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. गोकुळधामची दुनियादारी सोमवारी ते शनिवार दररोज रात्री ९ वाजता  फक्त मराठी या वाहिनीवर प्रसारित केला जाईल.

 “मराठीत आमच्या कार्यक्रमाची सुरूवात झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. फक्त मराठी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांपैकी एक आहे. याआधी, तारक मेहता का उल्टा चष्मा तेलगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून प्रसारित केला गेला होता. दोन वर्षांत ६०० हून अधिक भागांचे प्रसारण करून त्या शोने चांगली कामगिरी केली. आम्हाला विश्वास आहे कि या प्रादेशिक स्वरूपाचे प्रेक्षकांकडून कौतुक होईल असे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाचे निर्माते आणि नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असित कुमार मोदी म्हणतात.


तारक मेहता का उल्टा चष्मा २८ जुलै २००८ रोजी पहिल्यांदा सादर करण्यात आला आणि आतापर्यंत त्याचे २८०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत ज्यामुळे हा जगातील सर्वांत प्रदीर्घ काळ प्रसारित झालेला कॉमेडी शो बनला आहे.
'गोकुळधामची दुनियादारी' ही भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा ची मराठी आवृत्ती सुरू करण्याच्या घोषणेसाठी आम्ही उत्साहित आहोत" असे फक्त मराठी चे सह-प्रमोटर मनीष सिंघल म्हणतात.


फक्त मराठीचे सह-प्रमोटर शिरीष पट्टनशेट्टी यांनी सांगितलं की, आम्हाला खात्री आहे की समाजातील सर्व विभागातील प्रेक्षक त्यांची आवडती वाहिनी फक्त मराठीवरील या मनोरंजक मेजवानीचा आनंद घेतील. तारक मेहता का उल्टा चष्मा सारख्या उत्कृष्ट कन्टेन्टची निर्मिती करणारे असीत कुमार मोदी व नीला फिल्म प्रोडक्शन्स प्राइवेट लिमिटेड बरोबर सहयोग केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.

Web Title:  Now Tarak Mehta Ka Ulta Chashma can also be seen in Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.