Nnach baliye 9 madhurima tuli slap her ex boyfriend vishal aditya singh in rehearsal | धक्कादायक! नच बलिये 9: रिहर्सल दरम्यान एक्स कपलमध्ये खडाजंगी, मधुरिमाने लगावली विशालच्या श्रीमुखात
धक्कादायक! नच बलिये 9: रिहर्सल दरम्यान एक्स कपलमध्ये खडाजंगी, मधुरिमाने लगावली विशालच्या श्रीमुखात

नच बलिये 9मध्ये एक्स कपल आपल्या दमदार परफॉर्मेन्सने सगळ्यांची मनं जिंकत आहेत. या शोमध्ये मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग हे एक्स कपलसुद्धा सहभागी झाले आहे. दोघांमध्ये शोच्या दरम्यान नेहमी भांडण होताना दिसतात.  मधुरिमा आणि विशालने एकमेकांवर अनेक आरोपदेखील लावले आहे.  


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार दोघांमध्ये गुरुवाकी रिहर्सल दरम्यान खूप वाद-विवाद झाले. वादा-वादिचे रुपांतर कलांतराने धक्का-बुक्कीत झाले मधुरिमाने विशालवर हात उचलला. बॉलिवूड लाईफ वेबसाईटवर दोघांच्या भांडणा दरम्यानचा व्हिडीओ शेअर केलेला आहे.  
भांडणानंतर विशाल मधुरिमा जवळ गेला आणि धक्का बुक्की झाली. यानंतर मधुरिमाने विशालवर हात उचलला. दोघांमध्ये नेमकं कोणत्या गोष्टीला घेऊन वाद झाला ही गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे. विशालने काही दिवसांपूर्वी शो सोडण्याची धमकी दिली होती. मधुरिमाच्या म्हणण्यानुसार  विशाल नेहमीच म्हणतो मी शो सोडून देईन अशी धमकी देते हे सगळं तो त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी करतो. 


मधुरिमा आणि विशाल चंद्राकांतामध्ये एकत्र दिसले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्या रिलेशनशीपला सुरुवात झाली. मात्र दोघांचे नातं फारकाळ टिकले नाही आणि दोघांनी आपलं रस्ते बदलेले. आता दोघे नच बलियेमध्ये एकत्र दिसतायेत. दोघांच्या डान्सला खूप मस्ती मिळते दोघांमधली केमिस्ट्रीही शानदार आहे. 

Web Title: Nnach baliye 9 madhurima tuli slap her ex boyfriend vishal aditya singh in rehearsal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.