निर्मिती सावंत यांची धम्माल रिहर्सल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:54 PM2021-09-23T16:54:51+5:302021-09-23T16:57:16+5:30

Chala Hawa Yeu Dya : थुकरटवाडीतील हा व्हिडीओ एकदा पाहाच

nirmiti sawant instagram reels on chala hawa yeu dya set goes viral | निर्मिती सावंत यांची धम्माल रिहर्सल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

निर्मिती सावंत यांची धम्माल रिहर्सल, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Next
ठळक मुद्दे निर्मिती  सावंत यांनी नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या टीव्ही मालिकेमधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध आहेत.

मराठी मनाला खळखळून हसवणा-या दिग्गज अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांचा हा व्हिडीओ पाहाल तर हसून हसून पोट दुखेल. होय, सध्या जमाना आहे इन्स्टा रिलचा. निर्मितीही यात मागे नाहीत. त्यांचा इन्स्टा रील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवरचा हा व्हिडीओ म्हणजे नुसती धम्माल आहे.
 झी5 मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ फेम निर्मिती सावंत रिहर्सल करताना दिसत आहेत. सोबत आहे ‘चला हवा येऊ द्या’ची अख्खी टीम. निर्मिती सावंत या व्हिडीओत काहीतरी चित्रविचित्र आवाज काढत काहीतरी म्हणत आहेत. त्या नेमकं काय म्हणताहेत, हे कळत नाही. पण हा व्हिडीओ पाहून हसू मात्र आवरत नाही.  

 निर्मिती  सावंत यांनी नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या टीव्ही मालिकेमधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांची ही भूमिका आणि टीव्ही मालिका इतकी गाजली झाली की याच नावाने पुढे नाटक आणि चित्रपटाची पण निर्मिती करण्यात आली. या मालिकेमध्ये त्यांच्या सोबत पंढरीनाथ कांबळे यांची भूमिका होती. झी मराठी वरील  फु बाई फु  या कार्यक्रमात त्या जज म्हणूनही दिसल्या. बिनधास्त,नवरा माझा नवसाचा,कायद्याच बोला,हि पोरगी कुणाची,शुभमंगल सावधान  अशा अनेक चित्रपटांत त्यांनी वेगवेगळ्या भुमिका सााकारल्या.

Web Title: nirmiti sawant instagram reels on chala hawa yeu dya set goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app