nia sharma stop the car at mid night and started dance watch video | VIDEO : निया शर्माचा ‘फुल टू राडा’, अर्ध्या रात्री भररस्त्यावर तुफान डान्स

VIDEO : निया शर्माचा ‘फुल टू राडा’, अर्ध्या रात्री भररस्त्यावर तुफान डान्स

ठळक मुद्दे 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.

‘नागीन’ फेम निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे निया ट्रोलही होते. पण ट्रोलर्सची पर्वा करेन ती निया कुठली? सध्या नियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत निया मध्यरात्री भर रसत्यात मैत्रिणीसोबत  तुफान डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ म्हणजे काय तर फुल टू राडा.
सामसुम रस्त्यावर निया व तिच्या मैत्रिणीचा हा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.  यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिला असून तिच्या डान्सिंग कौशल्याचे कौतुक केले आहे. अर्थात काहींनी यानिमित्ताने नियाला ट्रोल करण्याची संधीही साधली. निया स्वत:ला बियॉन्से समजत आहे, असे एक युजरने तिला ट्रोल करताना लिहिलेय.

निया शर्माच्या या व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाख लोकांनी पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी निया समुद्रकिनारी धावताना बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला होता. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

निया सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण तिच्या चाहत्यांचीही संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. 
निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.

 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ’मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nia sharma stop the car at mid night and started dance watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.