'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, झाली या पात्राची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 11:18 AM2021-07-17T11:18:34+5:302021-07-17T11:18:56+5:30

आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

A new twist will come in the series 'Aai Kuthe Kay karte' | 'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, झाली या पात्राची एन्ट्री

'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, झाली या पात्राची एन्ट्री

Next

छोट्या पडद्यावरील मालिका आई कुठे काय करते सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. दरम्यान देशमुख कुटुंबात यश आणि गौरीच्या साखरपुड्याची लगबग असताना आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे नवीन पात्र तुमच्या चांगलेच परिचयाचे आहे मात्र कधी पहायला मिळाले नव्हते. हा व्यक्ती म्हणजे अरुंधतीचा दीर, अनिरूद्धचा भाऊ अविनाश देशमुख. मालिकेत अविनाश देशमुखच्या भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे दिसणार आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून घराघरात पोहचलेला अभिनेता शंतनू मोघे आई कुठे काय करते या मालिकेत    दिसणार आहे. अविनाशच्या येण्यामुळे देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात नव्या घडामोडी घडताना दिसणार आहेत.


आई कुठे काय करते मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अविनाश एन्ट्री होताना दाखवली आहे. या प्रोमोत अविनाश आणि अनिरुद्ध एकमेकांसोबत पंजा लढवताना दिसत आहे. यावेळी पंजा लढवण्याच्या स्पर्धेत अविनाशने अनिरूद्धकडे बक्षीसही मागितले. अविनाशने अनिरुद्धला विचारले की, मी जिंकलो तर मला मी मागेन ते देशील का? या खेळात अविनाश जिंकल्यानंतर तो अनिरुद्धला म्हणतो, दादा प्लीज या घरच्या लक्ष्मीला थांबव.’ अर्थात अरुंधतीला घरी थांबवण्याचा प्रयत्न कर, अशी मागणी अविनाश अनिरुद्धकडे करतो. त्यामुळे आता अरूंधतीला थांबवण्यासाठी अनिरुद्ध काही प्रयत्न करणार का, हे पाहावे लागले. 


देशमुखांच्या घरात सध्या एकीकडे यश आणि गौरीच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोटदेखील लवकरच होणार आहे. नुकतीच दोघांना घटस्फोटाची तारीख मिळाली आहे. या दिवसानंतर अरुंधती आणि अनिरुद्धचे रस्ते कायमचे वेगळे होणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A new twist will come in the series 'Aai Kuthe Kay karte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app