New twist in Mazya Navryachi Bayko, Radhika and Shanaya come together | 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, राधिका व शनाया या कारणासाठी आले एकत्र

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, राधिका व शनाया या कारणासाठी आले एकत्र

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. या मालिकेसोबतच या मालिकेतील मुख्य पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. आहे. गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. त्यात आता मालिकेत आणखीन एका पात्राची एन्ट्री झाली आहे ती म्हणजे माया. 

 नुकतेच झी मराठीने इंस्टाग्रामवर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

ज्यात शनाया राधिकाला गॅरी सध्या मायाच्या मागेपुढे करत असल्याचे सांगते. त्यानंतर त्या दोघी मिळून आता गॅरी उर्फ गुरूनाथ सुभेदारला धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. त्या दोघी मिळून गुरूनाथला धडा कसा शिकवणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: New twist in Mazya Navryachi Bayko, Radhika and Shanaya come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.