A new twist in 'Aggambai Sasubai', her honor to Shubhra who will get Asavari | 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सासूबाई'चे चित्रीकरण कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे थांबले होते. या मालिकेत आसावरी ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदीता सराफ यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहे. आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला असून मालिकेत आता इतके दिवस बबड्याची बाजू घेणाऱ्या आसावरी शुभ्राला तिचा मान मिळवून देताना दिसणार आहे. 


'अग्गंबाई सासूबाई'च्या नव्या प्रोमोमध्ये सोहम शुभ्राला या घरात रहायचे असेल तर तुला मंगळसूत्र घालावे लागेल असे सांगत मंगळसूत्र तिच्या दिशेने फेकतो. तितक्यात तिथे आसावरी येतात आणि ते मंगळसूत्र स्वतःच्या हातात घेतात. आसावरील शुभ्राला सांगतात की मी त्याचा बबड्या केला ही माझी चूक झाली. मी केलेली चूक तू पुन्हा करू नकोस. शुभ्रा तू माझ्यासाठी कोणताही त्याग करू नकोस. या घरच्या लक्ष्मीचा मान आता तुलाच राखायचा आहे. 


अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात बबड्याने सांगितल्यामुळे, अभिजीत राजेंनी आसावरीला न सांगता घरातून काढता पाय घेतला होता. आसावरीच्या अनेक प्रयत्नांनंतरही, त्यांनी खोटी कारणे देत घरी परतण्यास नकार दिला होता. त्यातच ते आजारी पडल्याने आसावरी त्यांची भेट घेण्यासाठी 'अभिज् किचन'मध्ये गेली होती. त्यानंतर मात्र, तिने थेट शुभ्रावर या सगळ्याचे खापर फोडण्यास सुरुवात केली होती.


शुभाने मंगळसूत्र घालण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आसावरीने तिच्याशी नाते तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तर, दुसरीकडे कोणीतरी आसावरी निराधार असल्याचे सांगत, कोणीतरी त्यांच्या घरी आश्रमातील महिलेला पाठवले होते. त्याचवेळी घरात शुभ्राच्या आई-बाबांची एंट्री झाली आहे. घरातील बिघडलेल्या परिस्थितीचा अंदाज आल्याने शुभ्राचे आई-वडील तिच्या घरी येतात. त्यावेळी राजेंबद्दल चौकशी केली असता, आसावरी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळते. मात्र, नेमक्या त्याचवेळी आलेल्या आश्रमातील महिलेमुळे ही गोष्ट बाहेर पडणार तितक्यात अभिजीत राजेंनी घरात धडाकेबाज एंट्री घेतली आहे. 


सगळ्या प्रकारादरम्यान शुभ्राने त्यांना इथल्या परिस्थितीची कल्पना देऊन घरी बोलावून घेतले, असे अभिजीत राजे आसावरीला सांगतात. हे समजल्यावर सगळे राग-रुसवे विसरून आसावरी शुभ्राला माफ करते. शुभ्राचे आई-वडील घरी जायला निघाल्यानंतर सोहम अभिजीत राजेंना घरातून निघून जाण्यास सांगतो. गाडीची चावी सापडत नसल्याने, तो अभिजीत राजेंसाठी थेट कॅब बुक करतो. मात्र, शुभ्राला याची कल्पना आल्याने, ती मुद्दाम आईकडे थांबण्याचा हट्ट करते. अभिजीत राजे घराबाहेर पडत असतानाच शुभ्रा आणि तिची आई परत आल्याने बबड्याच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरले आहे.


आता शुभ्राने सोहमचे सगळे डाव लक्षात घेऊन पुढे जाण्याचा निश्चय केला आहे. काहीही झाले तरी आपल्या सासूबाईंना पुन्हा एकदा खुश करण्यासाठी सून शुभ्रा बबड्याशी पंगा घेणार आहे. त्यामुळे सोहम आता काय करणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A new twist in 'Aggambai Sasubai', her honor to Shubhra who will get Asavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.