New story will start in marathi serial raja rani chi ga jodi | 'राजा रानीची गं जोडी'मध्ये फुलणार नवी लव्हस्टोरी !

'राजा रानीची गं जोडी'मध्ये फुलणार नवी लव्हस्टोरी !

 देव दर्शनानंतर संजीवनी आणि रणजीतच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. हळूहळू मालिकेमध्ये त्यांचे गोड नाते फुलताना प्रेक्षकांना बघायला मिळते आहे... संजीवनीचा बिनधास्त स्वभाव रणजीतला पाहिल्यापासूनच आवडतो आणि संजीवनीने ती जशी आहे तशीच राहावं अशी त्याची इच्छा आहे.  रणजीत देखील संजूबरोबर असताना त्याचा खोडकर आणि मिश्किल स्वभाव दिसून येतो.

 आता लवकरच संजू – रणजीत हनिमूनसाठी जाणार आहेत. राजा राणीची गं जोडी मालिका प्रेक्षकांसाठी लवकरच काहीतरी खास घेऊन येणार आहे.. सातार्‍यातील प्रसिध्द कास पठार येथे हनिमून विशेष भागाचे शूट झाले आहे... संजीवनी आणि रणजीत मधले सोनेरी क्षण सुंदर रोमँटिक गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत.

यांच्या नात्यातले काही क्षण ह्या गाण्यामध्ये अतिशय सुंदररित्या टिपले आहेत.. दोघांचा अनोखा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. संजू यानिमित्ताने एका वेगळ्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या विशेष भागाचे शूट करताना या दोघांनी बरीच मज्जा मस्ती केली. संजीवनी आणि रणजीतच्या नात्याची आता लवकरच होणार आहे लय भारी सुरुवात.  संजुच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाच्या या सरी कुठलं नवं वळणं घेऊन येतील हे कळेलच.
        

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New story will start in marathi serial raja rani chi ga jodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.