'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील मोहसिन खान या अभिनेत्याचा टॉप 10च्या यादीत सर्वात सेक्सी पुरूषांच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये  ऋतिक रोशन, विराट कोहली यासारख्या सेलिब्रेटींच्या नावांचा समावेश आहे. मोहसिन खान व्यतिरिक्त  शाहिद कपूर, जैन मलिक, हर्षद चोपड़ा, विवियन डीसेना, असीम रियाज यांनीही यंदाचा सेक्सी पुरूषांचा मान पटकावला आहे. 


मोहसिन खान 'ये रिश्ता क्या कहालाता है' मालिकेत कार्तिकच्या भूमिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे कार्तिक आणि नायरा या दोघांची केमिस्ट्री सा-यांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच मालिकेने मोहसिन खानला खरी लोकप्रियता मिळवून दिली आहे. मोहसिन खान आज कार्तिक या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्ध आहे. 12 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे.  'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यामुळे आगामी काळात ही मालिका नवनवीन रेकॉर्ड रचणार असंच दिसत आहे.  


तुर्तास मोहसिनचा आनंद गगणात मावेनासा झाल आहे.  मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या. मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता टीव्ही अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे.

 

त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. त्यामुळे आणखीन मी कसा स्वतःला फिट आणि मेटेंन ठेवेण याकडेच लक्ष केंद्रित करणार असल्याचे मोहसिनने म्हटले आहे.

Web Title: Neither Salman nor ShahRukh, Mohsin khan Becomes the sexiest male 2019, See his Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.