Nehha Pendse to replace Saumya Tandon in bhabiji ghar par hain? | 'भाभी जी घर पर है' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी 'ही' मराठीमोळी अभिनेत्री?

'भाभी जी घर पर है' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी 'ही' मराठीमोळी अभिनेत्री?

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. अशी चर्चा होत आहे की, टीव्हीवरील कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' साठी नेह पेंडसेला अ‍ॅप्रोच करण्यात आला आहे. अशीही चर्चा आहे की, नेह पेंडसे या मालिकेत सौम्या टंडनला रिप्लेस करणार आहे. 

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण आता त्यांना नवीन अनिता भाभी सापडली असं दिसतंय. 

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, 'भाभी जी घर पर है' या मालिकेची निर्माती बेनिफर कोहली अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा पेंडसेला घेण्यासाठी फार उत्सुक आहे. नेहाने बेनिफरच्या जुन्या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता या भूमिकेसाठीही तिला नेहा हवी आहे. पण अजून नेहाने या ऑफरवर काहीही उत्तर दिलेलं नाही.

दरम्यान सौम्या टंडनबाबत अशीही चर्चा होती की, खाजगी कारणामुळे तिने ही मालिका सोडली. पण असं मानलं जात आहे की लॉकडाऊननंतर करण्यात आलेल्या पे कट्समुळे ती चिंतेत होती. म्हणजे कमी पैसे मिळत असल्याने तिने ही मालिका सोडली असं बोललं जात आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nehha Pendse to replace Saumya Tandon in bhabiji ghar par hain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.